०२ जुलै दिनविशेष : नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

  घटना.

  १६९८ : थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिन चे पेटंट मिळवले.

  १८५० : बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.

  १८६५ : साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.

  १९४० : नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.

  १९६२ : रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.

  १९७२ : पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

  १९८३ : कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.

  १९९४ : चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.

  २००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.

  २००२ : स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.