०३ जुलै दिनविशेष : ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

  घटना.

  १६०८ : सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.

  १८५० : ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

  १८५२ : महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.

  १८५५ : भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

  १८८४ : डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.

  १८८६ : जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.

  १८९० : ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.

  १९२८ : लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.

  १९३८ : मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

  १९९८ : कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  २००० : विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.

  २००१ : सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

  २००६ : एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.