०४ जुलै दिनविशेष : भारत-पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला. ; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १०५४ : वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.

    १७७६ : अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.

    १८२६ : अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.

    १८८६ : फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.

    १९०३ : मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.

    १९११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.

    १९३६ : अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

    १९४६ : फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

    १९४७ : भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

    १९९५ : टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.

    १९९७ : नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

    १९९९ : लष्कराच्या १८व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.