०६ जुलै दिनविशेष : ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली. ; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १७३५ : मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

    १७८५ : डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.

    १८८५ : लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.

    १८९२ : ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.

    १९०८ : रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.

    १९१० : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.

    १९३९ : जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.

    १९४७ : रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.

    १९८२ : पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.

    २००६ : चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.