Accompanied by sweets, certificate of purity; 'Golden Bhog' with 24 carat gold showers for special Diwali

हल्ली खऱ्या सोन्याच्या शुद्धतेची कोण हमी देत नाही. मात्र, अमरावतीतील एका मिठाईच्या दुकानात दिवाळीसाठी (diwali) एक हटके मिठाई तयार करण्यात आली. 24 कॅरेट सोन्याच्या वर्खापासून ही मिठाई तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मिठाई सोबत  24 कॅरेट सोन्याच्या वर्खाचं सर्टिफिकेटही दिले जाते.   

अमरावती : हल्ली खऱ्या सोन्याच्या शुद्धतेची कोण हमी देत नाही. मात्र, अमरावतीतील एका मिठाईच्या दुकानात दिवाळीसाठी (diwali) एक हटके मिठाई तयार करण्यात आली. 24 कॅरेट सोन्याच्या वर्खापासून ही मिठाई तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मिठाई सोबत  24 कॅरेट सोन्याच्या वर्खाचं सर्टिफिकेटही दिले जाते.

इतर सणांप्रमाणे यंदाच्या दिवाळी सणावर देखील कोरोनाचे सावट पहायला मिळत आहे. मात्र, दिवाळीचा उत्साह कमी झालेला नाही. दिवाळी निमित्त अमरावतीच्या नामांकित रघुवीर मिठाई यांनी यावर्षी शुद्ध सोनेरी वर्ख असलेली ‘सोनेरी भोग’ ही मिठाई बाजारात आणली आहे. ही मिळाई तब्बल सात हजार रुपये किलो दराने विकली जात आहे.

विदर्भातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात ‘सोनेरी भोग’ (Gold Mithai)मिठाई यंदाच्या दिवाळीचे आकर्षण ठरली आहे. पिस्ता, केसर आणि हेझलनट या ड्रायफ्रुट्सपासून ही मिठाई तयार करण्यात आली आहे. या मिठाईवर लावण्यात आलेला वर्ख खास दिल्लीतील नोएडा येथून मागवण्यात आला आहे. मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या वर्खाचं प्रमाणपत्रही  दिलं जाणार आहे. राजस्थानमधील कारागिरांनी ही विशेष मिठाई खास दिवाळीसाठी तयार केली आहे.