diwali shopping crowded

दिवाळीपूर्व खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने ग्राहक आपल्या खासगी वाहनांतू बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी दाखल झाले होते. यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी सुद्धा झाली होती. कोल्हापूर बाजारपेठेत रविवारी तुफान गर्दी झाली होती.

कोल्हापूर : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात बंदिस्त असलेले नागरिक आता दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. मागील ७ महिन्यांच्या कालावधीनंतर आता बाजारेपठा ग्राहकांनी फुलल्या आहेत. कोल्हापुरात बाजारपेठांत रविवारी ग्राहकांनी तुफान गर्दी केली होती. दिवाळीपूर्व खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने ग्राहक आपल्या खासगी वाहनांतू बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी दाखल झाले होते. यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी सुद्धा झाली होती. कोल्हापूर बाजारपेठेत रविवारी तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तसेच अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले.

दिवाळी खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी

दिवाळी सण म्हटले की नवीन कपडे आणि घराची सजावटीकडे लोकांचे जास्त लक्ष आसते. सजावटीची खरेदी, कपडे तसेच बरेच वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहक दुकानांमध्ये गर्दी करत आङेत. तरुणाईमध्ये फॅशनची मोठी क्रेझ असून सध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे व रंगाचे कपडे आकर्षणाचे केंद्रबिंदू बनत आहेत. त्यामुळे दुकानांत रविवारी सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होत होती.

diwali shopping

मुंबईतील बाजारपेठांतही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

दिवाळी खरेदीसाठीचा शेवटचा रविवार असल्याने मुंबईकरांनी विविध साहित्य, वस्तू, कपडे, सजावटीचे सामान, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी अशा बऱ्याच वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. मुंबईतील सर्व बाजारपेठा सायंकाळनंतर फुलल्या होत्या. त्यामुळे सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमाला हरताळ फासल्याचे दिसत होते. तसेच सार्वजनिक वाहतू बंद असल्याने नागरिकांनी खासगी वाहनांनी प्रवास केला. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोडींचा सामना करावा लागला होता. खरेदीसाठी अनेकजण दादरला प्राधान्य देतात. रविवारी दादर टीटी, टिळक ब्रीज,पानेरी जंक्शन,प्लाझा यासोबतच सायन, कुर्ला तसेच सीएसएमटी परिसरात वाहतूककोंडी झाली होती.

पुण्यातील बाजारपेठांतही उसळली गर्दी

पुण्यातही दिवाळी खरेदीसाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. पुण्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. परंतु आता कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्यातील बाजारपेठांतही ग्राहकांनी तुफान गर्दी केली होती. परंतु रविवारी पुण्यातील बाजारपेठांमधील गर्दी पाहता पुणेकरांना कोरोनाचा विसर पडला की काय असा प्रश्न उद्भवत होता. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांपैकी काहींनी मास्कचा वापर व्यवस्थित केला होता तर काहींनी मास्क आपल्या गळ्यात अडकवलेला होता. पुण्यातही प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. तर खासगी वाहनांच्या पार्किगही वेटींगवर असल्याचे पाहायाल मिळाले.

नागपूरच्या बाजारात तुफान गर्दी

दिवाळीसाठी खरेदी करण्यासाठी नागपूरमधील सिताबर्डी मार्केटमध्ये ग्राहकांनी तुफान गर्दी केली होती. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पूर्णपणे सजल्या आहेत. ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणत उभारले आहेत.