पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलमध्ये दाखल, जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची त्यांची वार्षिक परंपरा सुरू ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कारगिलमध्ये दाखल झाले.

    आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. तब्बल दोन वर्षांनी देशभरात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या उत्साह आहे. सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची त्यांची वार्षिक परंपरा सुरू ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कारगिलमध्ये दाखल झाले. आज सैनिकांबरोबर नरेंद्र मोदी दिवाळी साजरी करणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कारगील येथे आगमन झालं असुन त्यांनी सर्वप्रथम सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी भाग्यवान आहे की मला तुमच्यासोबत सीमेवर वर्षानुवर्षे दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत आहे. माझ्यासाठी, तुम्ही वर्षानुवर्षे माझे कुटुंब आहात. माझ्या दीपावलीचा गोडवा तुमच्यामध्ये उगवतो, माझ्या दीपावलीचा प्रकाश तुमच्या पाठीशी आहे आणि पुढच्या दिवाळीपर्यंत माझे स्थान प्रकाशित करतो.