5.4 crore fraud in 'Statue of Unity'

केवडिया येथे स्थापित स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या (Statue of Unity) व्यवस्थापन मंडळाकडे अवघ्या दीड वर्षात ही रक्‍कम जमा झाली होती. या पुतळ्याचे व्यवस्थापन खासगी एजन्सीकडे आहे. या एजन्सीची नियुक्‍ती बडोदरा येथील एका खासगी बँकेने केली होती.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (Iron Man Sardar Vallabhbhai Patel) यांच्या महान आदर्शापासून प्रेरणा घेणे तर दूरच, परंतु जगातील सर्वात उंच असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (Statue of Unity) या त्यांच्या प्रतिमेला पाहणीसाठी जी तिकीट (tickets)  विक्री करण्यात येत होती, त्यामध्ये ५.४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे उघड झाले आहे. गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर हा पुतळा प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. हा पुतळा विदेशी पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

केवडिया येथे स्थापित स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्यवस्थापन मंडळाकडे अवघ्या दीड वर्षात ही रक्‍कम जमा झाली होती. या पुतळ्याचे व्यवस्थापन खासगी एजन्सीकडे आहे. या एजन्सीची नियुक्ती बडोदरा येथील एका खासगी बँकेने केली होती. या एजन्सीच्या कर्मचा-याने ५,२४,७७,३७५ रुपये रोख रक्कम स्टॅच्यू ऑफ युनिटी प्राधिकरणाच्या खात्यात जमा केली नाही. बँकेच्या व्यवस्थापनाने केवडिया पोलिस स्टेशनमध्ये ही एजन्सी आणि सोबतच काही अज्ञात लोकांविरुद्ध एफ.आय.आर. दाखल केला आहे. पैशाचा अपहार करणारे मोठमोठ्या धार्मिक संस्थेत अपहार करतात, तेव्हा सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या स्मारकाबाबत त्यांना कोणती अडचण असणार? बेईमानाच्या नियतीमध्ये नेहमीच खोट असते. या प्रकरणात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही.

एका अधिका-याच्या म्हणण्यानुसार खासगी बँक आणि रक्‍कम एकत्र करणा-या एजन्सीमधील हा व्यवहार आहे. युरोपच्या ‘एकीकरणाचे काम बिस्मार्कने केले होते. त्यापेक्षाही कितीतरी मोठी आव्हानात्मक भूमिका सरदार पटेलांनी वठविलेली आहे. प्रचंड दबाव असतानाही त्यांनी देशातील ६५० लहान-मोठ्या संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले होते. देशाच्या एकीकरणांमध्ये सरदार वल्लभभाई यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. हैदराबाद येथील निजामाला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे होते. तेव्हा हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर लुटालूट सुरू झाली होती. सरदार पटेलांनी तेथे सैन्य पाठवून तेथील निजामाला शरण येण्यास भाग पाडले. शेवटी तेथील निजामाला पाकिस्तानमध्ये पळून जावे लागले. पटेलांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले. अशा या महान व्यक्‍तीच्या स्मारकाच्या तिकिटामध्ये भ्रष्टाचार होणेही निंदनीय बाब आहे. अजूनही तेथील व्यवस्थेत सुधारणा झालेली नाही.