सर्वसामान्यांपुढे आव्हानांचा डोंगर…

कोरनाच्या दुऱ्या घातक लाटेमुळे देशातील णध्यमवर्गाला फटका बसला आहे. त्याला उद्योग , व्यवसाय, नोकरी, आणि कमाई यासंबंधीच्या चिंतेने पुन्हा एकदा घेरले आहे. करोनाने पीडित असंख्य मध्यमवर्गीयांचे घरचे अंदाजपत्रक अक्षरश: कोलमडून गेले आहे.

    अर्थात, 1 एप्रिल 2021 पासून लागू झालेल्या 2021 – 22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अरोग्य, शिक्षण , पायाभूत संरचना आणि शेअरबाजाराला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या तरतुदी केल्या आहेत. त्याचा लाभ मध्यमवर्गीयाना अप्रत्यक्षपणे निश्चित मिळेल. परंतु या अर्थसंकल्पात छोट्या प्राप्ती करदातांच्या अणि मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मध्यमवर्गीयांना कोणताही विशेष दिलासा मिळालेला नाही, हे स्पष्ट दिसते आहे. देशातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग पुन्हा एकदा धक्के खाऊ लागले आहेत. देशातील अनेक राज्यामध्ये लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यूसारखे निर्बंध पुन्हा लावले जात असतानाचं शहरातून स्थलांतरित मजूर भीतीपोटी पुन्हा एकदा आपल्या घराकडे परत जाताना दिसत आहेत. देशातील कोरोना बाधितांचा दररोजचा आकडा साडेतीन लाखांच्या पुढे गेल्यामुळे उद्योग आणि व्यवसाय करणारे चिंतेत आहेत. अशा स्थितीत देशातील उत्पादन आणि सेवा उद्योगाचा वेग मंदावला आहे. उद्योग आणि बाजाराच्या अशा चिंताजनक दृश्यामुळे मध्यमवर्गीयांची झोप उडाली आहे.

    अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या भारतातील मध्यमवर्गीयांच्या संख्येत झालेली घट दर्शविणाऱ्या अहवालात म्हटले आहे की, कोविड – 19 च्या साथीमुळे भारतातील मध्यमवर्गीयांची संख्या 9. 9 कोटीवरुन 6.6 कोटीवर आली आहे. अहवालानुसार दरदिवशी दहा डॉलर ते 20 डॉलर ( सुमारे 700 ते 1500 रुपये प्रतिदीन ) यादरम्यान कमाई असलेल्या वर्गाला मध्यमवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये कोरोना संसंर्गामुळे गेल्या एक वर्षापासून मध्यम वर्गात मोडणाऱ्यांची संख्या केवळ एक कोटीनेच घटली आहे. कोविड – 19 च्या साथीने एखीकडे देशातील मध्यमवर्गीयांची संख्या कमी झाली असतानाच दुसरीकडे या देशातील मध्यमवर्गीयांच्या डोक्यावरील कर्जाचाही बोजा वाढला आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, कोेरोना महामारीमुळे लोकांची रोजगारविषयक चिंता मोठ्या प्रमाणत वाढली आहे. वर्क प्रॉम होममुळे मोठ्या संख्येने डिजीटल तंत्रज्ञान, ब्रॉड बॅंड, विजेचे बिल अशा स्वरुपात लोकांच्या खर्चात वाढ झाली आहे. आणि त्यामुळे सरासरी उत्पन्न घटले आहे. मध्यमवर्गाच्या शेक्षणिक समस्याही वाढत चालल्या आहेत. सामाजिक प्रतिष्ठेसाठी आणि जिवनस्तर उंचावण्यासाठी मध्यमवर्गीयांकडून गृहकर्ज, वाहनकर्ज, ग्राहकोपयोगी, वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज, अशी वेगवेगळ्या प्रकारची कर्जे, मोट्या प्रमाणावर घेण्यात आली आहेत. परंतु या मध्यम वर्गाच्या चेहऱ्यावर आजमितीस महागाई, मुलांचे शिक्षण, रोजगार , कर्जावरील वाढते व्याज अशा अनेक चिंता स्पष्टपणे दिसून येत आहेत.