८ आमदारांच्या राजीनाम्यानंतर पक्षश्रेष्ठी झाले सतर्क

गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी १९ जून रोजी मतदान होऊ घातले आहे. तत्पूर्वीच काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे पक्ष अडचणीत आला आहे. आतापर्यंत ८ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला

 गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी १९ जून रोजी मतदान होऊ घातले आहे. तत्पूर्वीच काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे पक्ष अडचणीत आला आहे. आतापर्यंत ८ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आता राज्यात काँग्रेसचे केवळ ६५ आमदारच आहेत. काँग्रेसचे शक्तीशाली नेते म्हणून गुजरातमध्ये अहमद पटेल यांची ओळख आहे. परंतु ते सुद्धा या आमदारांना रोखण्यासाठी काँग्रेसने या आमदारांना तीन ठिकाणी वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. काँग्रेसने भाजपवर आमदारांना खरेदी करीत असल्याचा आरोप लावला आहे. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी असे ट्वीट केले होते. की गुजरातमध्ये भाजप सरकार कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अपयशी ठरले, परंतु आमदारांच्या खरेदी-विक्रीवर मात्र त्यांचे पुरते नियंत्रण आहे. काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे भाजपला राज्यसभा निवडणुकीत फायदा मिळणार आहे. येथे राज्यसभेच्या ४ जागासाठी निवडणूक होत आहे. यासाठी भाजपच्या ३ आणि काँग्रेसच्या २ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. पक्षाच्या आमदारच्या हिशेबाप्रमाणे भाजपला केवळ २ जागा मिळत होत्या, परंतु काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे भाजप आता ३ जागा जिंकू शकेल. याशिवाय ४ थ्या जागेसाठी दुसऱ्या प्राथमिकेत्या आधारावर सुद्धा भाजपच बाजी मारेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा देणार्या आमदारांबाबत नाराजी व्यक्त केली असून लोकांनी या आमदारांना चप्पलने बदडले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, इ.स.२०१७ च्या पाटीदार आंदोलनात हार्दिक यांच्यासोबत असलेले ब्रजेश मेरजा यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला. भाजपचे राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका येतात तेव्हा भाजप काँग्रेस आमदारावर दबावतंत्राचा वापर करीत असते. त्यांनी पक्ष सोडवा आणि भाजपमध्ये सहभागी व्हावे, असा भाजपचा प्रयत्न असतो. या पक्षांतर करणाऱ्या आमदारावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. १८२ सदस्यीय गुजरात विधानसभेत भाजपचे १०३ तर काँग्रेसचे ६५ आमदार आहेत