भारतातील हवा प्रदूषित, ट्रम्प यांचे बेताल वक्तव्य

भारतातील लोक नेहमी स्वच्छतेचे पालन करीत असतात. भात टॉयलेट पेपर च्या संस्कृतीचा देश नाही, हे ट्रम्पने लक्षात घ्यावे. भारतातील गंगानगी जगातील एकमेव अशी नदी आहे की, ज्या नदीचे पाणी साठवून ठेवले तर ते कित्येक वर्षे खराब होत नाही त्यात किडे किंवा जंतू पजत नाही. याउलट अमेरिकेतील कोणत्याही नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही.

अमेरिकेच्या (America president) राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचारादरम्यान ट्रम्प बेताल  (Donald Trump) वक्तव्य करीत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ते त्यांचा चांगला मित्र समजतात, परंतु भारताबद्दल मात्र अपमानजनक शब्दाचा वापर करतात. एका प्रचारसभेत ते म्हणाले की, भारताकडे बघा, तो किती घाणेरडा देश आहे. तेथील हवा किती प्रदूषित आहे. भारताबद्दल असा शब्दप्रयोग करताना ट्रम्प यांना थोडीही लाज कशी वाटली नाही. अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांत मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले आहे. तेथील हवा-पाणी प्रदूषित आहे. भारताबद्दल असा शब्दप्रयोग करताना ट्रम्प यांना थोडीही लाज कशी वाटली नाही. अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांत मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले आहे. तेथील हवा-पाणी प्रदूषित आहे. भारतामध्ये स्वातंत्र्यांनतर औद्योगिकीकरण सुरु झाले. पर्यावरण सुरक्षेच्या नावावर विकसित देश विकसनशील देशाकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. ज्या देशांनी अगोदरच आपला औद्योगिक विकास केलेला आहे. त्यांना आता भारताचा विकास सहन होत नाही. म्हणूनच कोळशावर आधारित विद्युत केंद्रावर ते आक्षेप घेत आहेत. शीतयुद्धाच्या काळात रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाने शेकडो अणुचाचण्या करुन पर्यावरणाची होनी केलेली आहे, ते मात्र अमेरिका विसरत आहे. भारताने तर इ.स. १९७४ आणि इ.स. १९९८ मध्येच केवळ दोनदाच अणुचाचण्या केलेल्या आहेत व त्याही अत्यंत कमी क्षमतेच्या इ.स. १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकणारी अमेरिका कोणत्या तोंडाणे म्हणत आहे की, भारताची हवा प्रदूषित आहे? ट्रम्पने अगोदर स्वतःच्या दोशाचे धोरण तपासावे. भारतातील लोक नेहमी स्वच्छतेचे पालन करीत असतात. भात टॉयलेट पेपर च्या संस्कृतीचा देश नाही, हे ट्रम्पने लक्षात घ्यावे. भारतातील गंगानगी जगातील एकमेव अशी नदी आहे की, ज्या नदीचे पाणी साठवून ठेवले तर ते कित्येक वर्षे खराब होत नाही त्यात किडे किंवा जंतू पजत नाही. याउलट अमेरिकेतील कोणत्याही नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही. भारतातील हवा गरम असल्यामुळे येथे धूळ उडणे स्वाभाविक आहे. अमेरिका श्रीमंत देश असल्यामुळे तेथे टाऊन प्लानिंग झालेले आहे. तेथे लोकसंख्याही भारतापेक्षा कितीतरी कमी आहे. पर्यावरणाछ्या बाबतीत भारत नेहमीच दक्ष असतो. भारत ऊर्जानिर्मिती करण्यासाठी नेहमी सजग असतो. उज्ज्वला योजनेअंतर्गत गरिबांना गॅस कनेक्शन देऊन भारताने कोळसा, लाकूड आणि भुसा जाळण्यावर प्रतिबंध लावलेले आहेत. धुके आणि धुराची समस्या भारतातच आहे. असे नाही तर ती ब्रिटन आणि लिवरपूल येथेही आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पराली जाळल्यामुळे जो धूर होतो. त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. जर भारत घाणेरडा देश तर अमेरिकेचे पर्यटक का येतात? ट्रम्पकडे याचे उत्तर आहे का?