महत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अत्यंत महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. पंजाबमध्येही 'आप' ने निवडणुका लढविल्या होत्या. देशातील इतर राज्यामध्येही 'आप'चा विस्तार व्हावा, असे केजरीवालांना वाटते. त्यामुळे ते दिल्लीच्या बाहेरसुद्धा पक्षाचा बिस्तार करण्याच्या प्रयत्नात असतात.

    पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत, आता याकडे केजरीवालांचे लक्ष आहेत. कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करता विधानसभेच्या 182 जागा स्वबळावर लढविण्याची घोषणा त्यांनी केली. अहमदाबादमध्ये केजरीवालांनी त्यांच्या ‘आप’ पक्षाचे कार्यालयही सुरू केलेले आहे. केजरीवालांच्या या घोषणेमुळे भाजपा मात्र आनंदित झालेला आहे, कारण यामुळे भाजपाची राजकीय परिस्थिती आणखी चांगली होणार आहे. काँग्रेस पक्ष मात्र केजरीवालांच्या या घोषणेमुळे अस्वस्थ झालेला आहे. असे होणे स्वाभाविकच आहे कारण भाजपाकडे संघ स्वयंसेवकांचे कॅडर आहे. काँग्रेसचे मात्र त्यांचे परंपरागत मतदार दलित, मुस्लिम आणि युवक यांच्यावरच विश्‍वास आहे. *आप’सुद्धा याच मतदारावर विसंबून आहे. त्यांनाही युवकांची मते आपल्यालाच मिळतील, असा विश्‍वास आहे. एकूणच आम आदमी पक्ष काँग्रेसच्याच मतांना सुरुंग लावतील. गुजरातमध्ये ‘आप’ने मोठ्या प्रमाणावर युवकांना पक्षाचे सद्स्य बनविले आहे. मागील 30 वर्षांपासून काँग्रेस आणि भाजपा साटेलोटे करून गुजरातच्या सत्तेवर आहे, असा आरोप करून केजरीवाल म्हणाले की, ‘आप’ हाच आता या पक्षांना योग्य पर्याय ठरू शकेल. ‘आप’ जेथे कुठे निवडणुका ळढवितात तेथे ते काँग्रेस पक्षाचीच मते विभाजित करतात. अगोदरच काँग्रेसला गुजरातमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसचे तेथील सर्वांत मोठे नेते आणि सोनिया गांधी यांचे विश्‍वासू सल्लागार अहमद पटेल यांचे निधन झालेले आहे. गुजरात काँग्रेसचे प्रभावी युवा खासदार राजीव सातव यांचेही कोरोनामुळे नुकतेच निधन झाले आहे. गुजरातमधील पटेळ-पाटीदारांची मते मिळविण्यासाठी केजरीवाल पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे. गुजरातच्या जनतेपुढे योग्य पर्याय नसल्यामुळे जनता कधी भाजपा तर कधी काँग्रेसची निवड करीत होती, परंतु योग्य पर्याय दिळा तर त मालप व काँग्रेसला निवडणार नाही, असा केजरीवालांचा दावा आहे.