निसर्गाचा आणखी एक प्रकोप

निसर्ग खरोखरच मानवावर कोपला आहे काय? कोरोना महामारी, भूकंप, पृथ्वीच्या तापमानात वाढ होणे, ग्लेशियरचे वितळणे, बंगाल आणि ओरिसामधील चक्रीवादळ इत्यादी घटना आम्हाला विचलित करणाऱ्या आहेत. त्यापेक्षा

 निसर्ग खरोखरच मानवावर कोपला आहे काय? कोरोना महामारी, भूकंप, पृथ्वीच्या तापमानात वाढ होणे, ग्लेशियरचे वितळणे, बंगाल आणि ओरिसामधील चक्रीवादळ इत्यादी घटना आम्हाला विचलित करणाऱ्या आहेत. त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान मागील काही दशकात झालेले आहे. मनुष्यप्राणी नेहमीच निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करित असतो. निसर्गाच्या विरुद्ध वागत असतो. त्यामुळे निसर्ग आपले रौद्ररुप धारण करीत असतो. वीज कोसळून २४ जण दगावले. गोपालगंज येथे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व शेतकरी होते. यावेळी आतापर्यंत वीड कोसळून १०७ जणांचा मृत्यू झाल आहे. पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटना होतातचय परंतु इतक्या मोठ्या संख्येने वीज कोसळून लोकांचा मृत्यू होणे ही स्तब्ध करणारी घटना आहे. पावसाळ्यात शेतकरी-मजूर शेतांमध्ये शेतीची कामे करीत असतात. या शेतकरी मजुरांना थंडी, ऊन, पावसाचा नेहमीच धोका असतो. आकाशातून येणारी वीज इतकी शक्तीशाली असते की, वैज्ञानिक सुद्धा या विजेला नियंत्रणात आणू शकत नाही. दरम्यान ब्रम्हपुत्रा नदीला पूर आला. या पुराने पूर्वेकडील राज्यात हाहाकार झाला. बिहारमध्ये तर दोन वर्षानंतर तेथील नद्यांना महापूर येत असतो व यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीत व वित्तहानी होत असते. यावेळी देशाची राजधानी दिल्ली आणि परिससरालाही भूकंपाचे झटके बसले. या भूकंपामूळे नागालँड आणि मिझोराम ही राज्येही हादरली पर्यावरण प्रदुषणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त होत असतानाच जगातील मोठ्या राष्ट्रांमध्ये अॅटबॉम्ब, केमिकल शस्त्रे बनविण्यात येत आहे. पृथ्वी आणि अवकाशाला व्यापून टाकणारे देश स्वताला सभ्य समजत असले, तरी निसर्गाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर निसर्ग या सर्वांना बरबाद केल्याशिवाय राहणार नाही.