‘

लडाख (Ladakh) सीमेवर भारतीय सैन्य चीनी सैन्याविरोधात तैनात आहेत. तिथे ऑक्टोंबर (October) महिन्यापासून बर्फवृष्टीला सुरूवात होईल. त्यामुळे भारत आपल्या सैनिकांची काळजी घेण्यासाठी सज्ज राहू शकत नाही, असे सांगितले जात आहे.

चीनमधील (China) माध्यमे आणि त्यांचे भारतीय माध्यमातील हस्तक सध्या एक दुष्प्रचार करत आहेत. लडाख (Ladakh) सीमेवर भारतीय सैन्य चीनी सैन्याविरोधात तैनात आहेत. तिथे ऑक्टोंबर (October) महिन्यापासून बर्फवृष्टीला सुरूवात होईल. त्यामुळे भारत आपल्या सैनिकांची काळजी घेण्यासाठी सज्ज राहू शकत नाही, असे सांगितले जात आहे. थोडक्यात, सैनिकांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या पाणी (Water), अन्नधान्य (Food) या गरजा किंवा लढाईला तोंड फुटले तर दारूगोळा पुरवण्यास म्हणजे सीमेवरील सैनिकांना रसद पुरवण्यात भारतीय सैन्याला खूप त्रास होऊ शकतो. चीनकडून केला जाणारा हा दुष्प्रचार अत्यंत चुकीचा आहे. कारण, ऑक्टोंबर, नोव्हेंबरपर्यंत बर्फवृष्टी झाली तरीही भारतीय सैन्य युद्धाला सामोरे जाण्यासाठी पुर्णत: सज्ज आहे.

भारतीय सैन्याचे व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन किंवा लॉजिस्टीक हे चीनच्या तुलनेत अधिक चांगले आहे. लडाखचा हा भाग १४ हजार फूट उंचीवर आहे. त्यामुळेच पुढील महिन्यापासून तिथे जेव्हा बर्फवृष्टीला सुरूवात होईल. तेव्हा रस्ते बंद होतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन सैन्यासा लागणारे सामान, दारूगोळा, संरक्षण साहित्य, इंधन किंवा अन्नधान्य हे सर्व सामान हे अगोदरच साठवून ठेवले जाते. याला सैन्याच्या भाषेत विंटर स्टॉंकिंग म्हणतात. लडाख सीमेवर जाण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत. सैनिकांना सामान पोहोचवण्यासाठी एक रस्ता जम्मूतून सुरू होतो आणि बनिहाल खिंडीमधून श्रीनगरमध्ये जातो. तिथून तो जोझिला खिंडीमधून द्रासमध्ये पोहोचतो आणि मग कारगिलमधून तो रस्ता लेहमध्ये जातो. हा रस्ता वर्षातील सहा ते सात महिनेच वाहतुकीसाठी खुला असतो.

यावेळी मात्र बर्फ हटवणारी आधुनिक यंत्रणा आपल्याकडे असल्याने हा रस्ता नोव्हेंबरपर्यंत खुला असेल. त्यामुळे सैनिकांना सर्व प्रकारची रसद नियमितपणे पुरवण्यासाठी आपल्याला त्या मार्गाचा फायदा होईल. दुसरा रस्ता हिमाचल प्रदेशातून सुरू होईन खारदुंगला खिंडीतून लेहला पोहोचतो. तो देखील पाच ते सहा महिने सुरू असतो. उर्वरित महिने तो बंदत असतो. यावेळी आता तिथे आपण एक बोगदा खोदला आहे. त्यामुळे हा रस्तादेखील सात ते आठ महिने खुला राहण्याची शक्यता आहे.