रामाच्या नावावर भाजपाला मिळाले यश ‘पण, काँग्रेसचे ‘काय होणार?

काँग्रेस पक्ष नेहमीच स्वतःला धर्मनिरपेक्षतेचा समर्थक समजून भाजपाला सांप्रदायिक पक्ष म्हणत आलेला आहे. काँग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षासाठी भाजपा अस्पृश्यासारखाच होता.

    काँग्रेसचा हा सर्व प्रकार मुस्लीम मतांचे तुष्टीकरण करण्यासाठीच होता. तसे पाहिले तर काँग्रेसचे कितीतरी नेते धर्मांध होते, आणि बाहेरून मात्र धर्मनिरपेक्षतेचा दिखावा करीत होते. या काँग्रेसजणांना स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटत होती. गेल्या कित्येक दशकांपासून काँग्रेसजणांचे धोरण राहिलेले आहे. याउलट भाजपाने अगदी सुरुवातीपासूनच अयोध्येला राममंदिर उभारणे आपल्या अजेंड्यावर ठेवले होते. इ.स. १९९२ मध्ये निघालेली रामरथ यात्रा आणि बाबरी मशीद पाडणे या घटना साक्षीदार आहेत.

    गेल्या अनेक दशकांपासून भाजपाचे हे धैर्य त्यांना फायद्याचे ठरले असून इ.स. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएचे सरकार सत्तारूढ झाले आणि काँग्रेसला केंद्रीय सत्तेपासून वंचित राहावे लागले. इ.स. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने प्रचंड बहुमताने पुन्हा केंद्राची सत्ता मिळविली. तेव्हा काँग्रेसच्या हे लक्षात आले की, धर्मनिरपेक्षतेचा मुद्द आता काही उपयोगाचा नाही. राहुल गांधी यांनी मंदिरात जाणे सुरू केले.

    राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी पारसी होते, तरीही राहुलने जाणवेधारी ब्राह्मण असल्याचे स्वतःला जाहीर केले. परंतु जनतेवर याचा काहीही प्रभाव पडला नाही आणि इ.स. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बेहाल झाले. राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभव झाला, परंतु केरळमधीळ वायनाड मतदारसंघात विजयी झाल्यामुळे ते लोकसभेत पोहोचू शकले. इंदिरा गांधी ह्यासुद्धा रुद्राक्षाची माळ गळ्यात घालत होत्या आणि मंदिरात जाऊन देवदर्शन घेत होत्या. पुरी येथी जगन्नाथ मंदिरात प्रवेश देण्यासाठी तेथील पंड्यांनी त्यांना रोखले होते, परंतु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा त्यांना आशीर्वाद होता.

    आता काँग्रेसच्या हे लक्षात आले की, भाजपाची नौका जर रामाच्या नावाने पैलतिरी पोहचू शकते तर आपण का मागे राहावे! देशातील इतर राजकीय पक्षांचीही भूमिका काहीशी अशीच असू शकते. समाजवादी पक्षाने भगवान श्रीरामाची नगरी ओरछा (मध्यप्रदेश) येथे संमेळन घेतले. यानंतर आता काँग्रेसनेसुद्धा मध्यप्रदेशातील त्यांच्या आमदारांचे २ दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची तयारी सुरू केलेली आहे.

    येथे काँग्रेस पक्ष त्यांच्या आमदारांना इ.स. २०२३ च्या निवडणुकीत विजयी होण्याचा मंत्र देणार आहे. यावर भाजपाने अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केलेली आहे की, काँग्रेस पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी ढोंग करीत आहेत. परंतु रामळलाची कृपा मात्र आता काँग्रेसवर होणारच नाही. कमलनाथांनी ओरछा येथे प्रदेश काँग्रेसचे अधिवेशन आयोजित केले होते, परंतु पुन्हा त्यांना राज्याची सत्ता मिळू शकली नाही.