मणिपूरमधील भाजपची सत्ता संपुष्टात येणार

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार संकटात सापडले आहे. या आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री वाय. जयकुमारसिंह यांच्या ४ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या

 मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार संकटात सापडले आहे. या आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री वाय. जयकुमारसिंह यांच्या ४ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या मत्र्यांसोबतच भाजपच्या ३ आमदारांनीही भाजपचा राजीनामा दिला असून या तिन्ही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या आघाडी सरकारला नॅशनल पिपल्स पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता. मंत्री आणि आणदारांमधअये असलेल्या असंतोषाचे कारण मात्र अजून स्पष्ट झालेले नाही आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदाक टी. राबिंद्रोसिंह आणि अपक्ष आमदार शहाबुद्दीन यांनी सरकारला दिलेला पाठींबा काढून घेतला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ओकराम इबोतिसंह यांना मात्र पूर्ण विश्वस आहे की, काँग्रेसकडे राज्याची सत्ता येऊ शकते. परंतु मणिपूरची एकूणच अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेता राज्यपालांच्या शिफारशीवरून केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करु शकेल. जर असे झाले तर काँग्रेसची राज्याची सत्ता मिळवण्याची इच्छा पूर्ण होणार नाही. सर्वप्रथम विधानसभेत शक्तीपरिक्षण घेऊन सरकार खरोखरच अडचणीत आहे का हे सिद्ध करावे लागेल. यासाठी विधान परिषदेचे अधिवेशन बोलवावे लागेल, परंतु हे सर्व विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून आहे. विधानसभेत मुख्यमंत्री विरेनसिंह यांना विश्वासदर्शक ठराव मांडून तो पारित करुन घ्यावा, असे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना सांगु शकेल, दुसरीकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ओकराम इबोतिसिंह यांनी म्हटले आहे की, लवकरच आम्ही राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारची स्थापना करु. भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारवर सभागृहात अविश्वास ठराव पारित करण्यात येईल. भाजपचा राजीनामा देणाऱ्या सर्वच मंत्री आणि आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष युमनाम खेमचंदसिंह यांची भेट घेऊन विधानसभेचे अधिवेशन त्वरित बोलवण्यात यावे. अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षाकडून करण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले