तत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी

७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना निवडणुकीमध्ये पक्षाची उमेदवारी द्यायची नाही असा नियम भाजपाने बनविला होता. या नियमानुसार पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना उमेदवारी नाकारून त्यांना भाजपाने मार्गदर्शक मंडळात घेतले होते. म्हणजेच सक्रिय राजकारणापासून या नेत्यांना दूर ठेवण्यात आले होते.

    आ नंदीबेन पटेल यांनाही गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवून मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी त्यांची वर्णी लावण्यात आली होती. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना विश्रांती मिळावी यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. यामुळे पक्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या नेत्यांना राजकारणात येण्याची संधी मिळणार होती. वाढल्यामुळे मनुष्याचा स्मृतिभ्रंश होतो. दृष्टी आणि श्रवणशकक्‍तीही कमजोर होत असते. हेच लक्षात घेऊनच सरकारी नोकरदारांना वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी निवृत करण्यात येते. सैन्यामध्ये तर ३५ वर्षाचे वय झाल्यानंतर सेवानिवृत केले जाते. याउलट राजकारणात मात्र वयाच्या साठीनंतरच नेत्यांना यशस्वी होण्याची अपेक्षा असते.

    भाजपाने ७५ वर्षे वयाची उमेदवारीसाठी अट ठेवल्यानंतरसुद्धा ७७ वर्षे वयाचे येदियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. खरं म्हणजे कर्नाटकमध्ये भाजपाकडे त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळेच येदियुरप्पांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करावी ळागली. आता पुन्हा आपलाच नियम बाजूला सारून भाजपाने मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन यांना केरळमधील पळक्कड मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. ८९ वर्षीय श्रीधरन यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नाही आणि राजकारण हे त्यांचे क्षेत्रही नाही.

    दिल्ली मेट्रो आणि कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये श्रीधरन यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या वयात त्यांना राजकारणात आणण्याचा भाजपाचा निर्णय विसंगत असाच आहे. भाजपा त्यांच्या नाबलौकिकांचा लाभ घेऊ पाहत आहे. राजकारणात स्वच्छ प्रतिमा असणे ही काही यशाची खात्री नसते. देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन हे जेव्हा लोकसभा निवडणुकीत उमेदवार होते, तेव्हा त्यांची जमानत जप्त झाली होती. श्रीधरन यांना केरळचे भावी मुख्यमंत्री म्हणून भाजपा पुढे आणू इच्छित आहे. जनता त्यांना स्वीकारतील काय हे आता बघायचे आहे.