bollywood celeb drugs list

कोट्यावधी संपत्ती कमविल्यानंतरदेखील अशा लोकांजवळ कोणतेही सिद्धांत जीवनमूल्ये नाहीत. मुंबई पोलिसांना बॉलिवूडवर असलेल्या या ड्रग्जच्या विळख्याची माहिती नव्हती? जर सीबीआय व एनसीबीसारख्या केंद्रीय तपास संस्थांनी तपास केला नसता, तर वास्तविकता समोर आलीच नसती. बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत, ज्याची काही नैतिक मूल्ये व आदर्श आहेत.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूचा तपास वाढत वाढत ड्रग्जच्या (Drugs) उन्मादापर्यंत जाऊन पोहोचला. हे सिने दर्शकांसाठी आघात करणारे आहे की, चित्रपटातील अभिनेत्री ड्रग्ज सेवनाच्या आहारी गेल्या आहेत. हे औदासिन्य किंवा डिप्रेशनमुळे न होता शौक म्हणून होत आहे. दीपिका पादुकोनसारखी (Dipika Padukone) प्रतिभाशाली अभिनेत्री जिने चेन्नई एक्सप्रेस, पद्मावतसारख्या चित्रपटांतून प्रशंसकांना प्रभावित केले, तिचे नाव ड्रग्ज अॅडिक्शनमध्ये समोर आले आङे. दीपिकाने कोण्या करिश्माबरोबर चॅट करत “माल” म्हणजेच ड्रग्जची मागणी केली आहे. दीपिकाशिवाय सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह यांच्याभोवतीही फास आवळण्यात आला आहे. ड्रग्ज पॅडलर व ड्रग्ज युजर्स यांच्यामधील चॅट समोर आल्याममुळे प्रकरण तापले आहे. असे देखील म्हटले जात आहे की, सुशांतसिंग फिल्मी अभिनेत्रींबरोबर पार्टी करत होते. ज्यात ड्रग्जचे सेवन केले जात होते. या प्रकरणाचे कायदेशील शिवाय नैतिक व सामाजिक पैलूदेखील आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीत रिया चक्रवर्तीने २५ बॉलिवूड सेलिब्रिटीजची नावे सांगितले आहेत. जे ड्रग्जचा उपयोग किंवा तस्करी करीत आहेत. कोट्यावधी संपत्ती कमविल्यानंतरदेखील अशा लोकांजवळ कोणतेही सिद्धांत जीवनमूल्ये नाहीत. मुंबई पोलिसांना बॉलिवूडवर असलेल्या या ड्रग्जच्या विळख्याची माहिती नव्हती? जर सीबीआय व एनसीबीसारख्या केंद्रीय तपास संस्थांनी तपास केला नसता, तर वास्तविकता समोर आलीच नसती. बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत, ज्याची काही नैतिक मूल्ये व आदर्श आहेत. व ते आपली ईमेज व पत लपत घेतात व कोणत्याही वादापासून दूर आहेत. यांच्या अपवाद सोडला तर पूर्वीदेखील नशा करण्यात येत होती. जी मद्यपानापर्यंत मर्यादित होती. मीनाकुमारीचा जीव दारुमुळेच गेला. राज कपूरसारख्या प्रतिभाशाली दिग्दर्शक व अभिनेता मद्यपान करीत होते. याच साखळीत मोतीलाल व के. एल सहगलसारख्या जुन्या अभिनेत्यांचेही नाव घेतले जात होते. जेव्हापासून ड्रग्जचे पर्व सुरु झाले. फिरोज खानचा मुलगा फरीदनचे करिअर याच व्यसनामुळे धुळीत मिळाला. संजय दत्त मोठ्या कठीणाईने ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर आला. सुनील दत्तने अमेरिकेला पाठवून त्याच्यावर उपचार केले होते. ममता कुलकर्णीसारख्या अभिनेत्रीचा पती ड्रग्ज पॅडलर होता, असे सांगण्यात येत होते. हे खरे आहे की, सगळ्या बॉलिवूडला ड्रग्जच्या प्रकरणात गोवता येणार नाही. परंतु फिल्मोद्योगाला याच्या काळ्या छायेपासून दूर राहावे लागणार आहेत. कायद्याचा बडगा अशा लोकांना खडबडून जागे करेल. जे दादासाहेब फाळकेंचा वारसा लाभलेल्या फिल्मोद्योगाला आपल्या मौजमस्तीने बदनाम करीत आहे.