coal scam

'कोळसामाफिया अनुप मांझीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली. मांझीचे ईस्टर्न कोलफिल्डच्या २ महाव्यवस्थ्यापकांसोबत आणि ३ सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत संगनमत असल्याचे उघड झाले आहे. बंगालसोबतच बिहार, झारखंड आणि उप्रमध्येही धाडी टाकण्यात आल्या. '

युपीए सरकारच्या काळातील कोळसा घोटाळा (Coal scam) खूप गाजला होता. अपात्र लोकांना कोळसा खाणी आवंटित करण्यात आल्या होत्या. आताही जेथे-जेथे कोळसा आहे, त्या सर्व ठिकाणी घोटाळे होतच आहेत. कोळसा माफिया आणि अधिका-यांच्या संगनमताने (connivance) हे घोटाळे होत असते. सीबीआयने अवैध कोळसा व्यावसायिकांवर ( mafia and officials) कारवाई करीत बंगालसह ४ राज्यांतील ४५ ठिकाणी छापेमारी केली. कोळसामाफिया अनुप मांझीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली. मांझीचे ईस्टर्न ‘कोलफिल्डच्या २ महाव्यवस्थापकांसोबत आणि ३ सुरक्षा कर्मचा- यांसोबत संगनमत असल्याचे उघड झाले आहे.

बंगालसोबतच मांझी लाल इस्टर्न कोल्डफिल्डच्या कुनुस्तोरिया आणि कजोरा विभागातील लीजवर देण्यात खाणीमधून मोठ्या प्रमाणावर उत्खनन करीत होता. या प्रकरणात ईसीएल, ‘सीआयएसएफ आणि रेल्वेच्या अधिका-यांचे संगनमत असल्याचे उघड झाले आहेत. या खाणीमधून कोळसा काढण्यासाठी मोठमोठ्या मशीनचा वापर करण्यात येत होता. या मशीन, ट्रक आणि अनेक ट्रॅक्‍टर जप्त करण्यात आले आहे. सीबीआयने मांझीशिवाय कुनुस्तोरिया विभागाचे महाव्यवस्थापक अमितकुमार धर, काजारे, विभागाचे महाव्यवस्थापक जयेशचंद्र राय, ईसीएलचे सुरक्षाप्रमुख तन्मय दास, सुरक्षा निरीक्षक धनंजय राय, देवाशीष मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

रक्षकच भक्षक बनल्याचे या प्रकरणी दिसून येत आहे. या कोळसा तस्करीमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचा-यापासून तर थेट महाव्यवस्थापकांनी हातमिळवणी केली होती. हे प्रकरण तेव्हा उघड झाले जेव्हा की, ७ ऑगस्ट २०२० रोजी पांडवेश्‍वर विभागातील रेल्वे मार्गाच्या बाजूला ९ मेट्रिक टन कोळसाचे ढिगारे अनेक दिवसांपासून पडून होते. काही रेल्वे अधिका-यांचेही या कोळसा तस्करांसोबत संगनमत होते. तथापि, काही अज्ञात लोकांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यामुळे हा सर्व घोटाळा उघडकीस आला.