२२ मृतदेह कोंबणे हा अमानवीयतेचा कळस…

दिवंगत व्यक्तिच्या प्रती सन्मान व्यक्त करणे. ही आमची परंपरा आहे. हे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात दिवंगतांप्रति आदरभाव व्यक्त करण्यात येतोे. परंतु सध्या कोरोना महामारीच्या संकटकाळात मृतदेहाची अवहेलना होताना दिसत आहे.

    बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका रुग्णवाहिकेमध्ये 22 मृतदेह कोंबण्यात आले. मृतकाच्या कुटुंबीयांनी मोबाईलद्वारे या घटनेचे फोटो काढण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्या जवळचे मोबाईल हिसकावून घेतले. हे मृतक जरी कोरोना पॉझिटीव्ह होते तरी, त्यांच्या मृतदेहाना रुग्णवाहिकेमध्ये ज्या पद्धतीने कोंबण्यात येच होते. ती पद्धतच अत्यंत चुकीची आणि अमानवीय होती. या मृतकांमध्ये अनेकांचे आई – वडील , पती – पत्नी, मुलं – मुली , असतील. या मृतकदेहाना कचरा कुंडीत कचरा टाकल्याप्रमाणे टाकले गेले असतील तर मृतांच्या नातेवाईकांना किती दु:ख झाले असेल.

    मृतकांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. रस्त्याने एखादी प्रेतयात्रा जात असते,तेव्हा रस्त्याने ये – जा करणारे लोकही रस्त्यावर थांबतात. हात जोडून त्या शवयात्रेला नमस्कार करतात. स्मशानभूमीवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा घेण्यात येते. नदीमध्ये अस्थिविसर्जन करण्यात येते. परंतु यावेळी मात्र कोरोना महामारीमुळे या सर्व प्रथा – परंपरा पुर्णपणे मोडीत निघाल्या आहेत. कोरोनामुळे तर सर्वच परिस्थिती गंभीर झाली आहे. आता तर मुलगा आपल्या कोेरोना संक्रमित पित्याला रस्त्यावर सोडून देतो. त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठीही पुढाकार घेत नाही. रुग्णालयांमध्येही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. ऑक्सिजन आणि खाटांचा तुटवडा आहे. अनेक रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत आहे. 4 – 4 दिवस टेस्टचा रिपोर्ट मिळत नसल्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाहीत.

    एकूणच सर्वच परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. स्मशानघाटावर तर मृतदाहांचे दहन करण्यासाठी जागा मिळत नाही. तितेही वेटिंग सुरु आहे. रेमडेसिवीर लसीचा आणि औषधाचा सर्वत्र तुटवडा आहे. अॅंम्बुलन्साठी हजारोे रुपयाची मागणी करणारे आणि मृतदेहाना बेमुर्वतपणे गाडीत कोंबणारे मनुष्य म्हणण्याच्या लायकीचेच नाहीत.