Aarogya setu App

आरोग्य सेतू ॲपच्या वेबसाईटवर मात्र या ॲपची निर्मिती नॅशनल इन्फॉर्मेटेक सेंटर आणि आय.टी. मंत्रालयाने केळी असल्याचा उल्लेख आहे. सूचना आयोगाने या संदर्भात संबंधित विभागाला कारणे दाखवा नोटीसद्वारे विचारणा केलेली आहे की, या ॲपच्या डेव्हळपमेंटबाबत कोणतीही माहिती एनआयसीकडे का नाही?

देशातील कोट्यवधी लोक वापरत असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेळा आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास प्रोत्साहन दिलेल्या आरोग्य सेतू’ ॲपबद्दल विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे ॲप कोणी तयार केले याबद्दल मात्र अजूनही संदिग्धता आहे. सामाजिक कार्यकर्ते सौरव दास यांनी माहिती आयोगाकडे अशी तक्रार केली आहे की, कोट्यवधी लोकांची माहिती गोळा करणा-या या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप’बद्दल सांगण्यास मात्र केंद्र सरकारचे कोणतेही मंत्रालय तयार नाही. दास यांनी माहितीच्या अधिकारान्वये या ॲपबद्दलचे सुरुवातीचे प्रस्ताव, या ॲपला मिळालेली मंजुरी, या ॲप निर्मितीमध्ये सहभागी कंपन्या व व्यक्‍ती याबद्दलची माहिती सरकारला मागितली होती, परंतु सरकारकडे मात्र या ॲपबद्द लची कोणतीही माहिती नाही. या संदर्भात केंद्रीय सूचना आयोगाने एनआयसीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरोग्य सेतू ॲपच्या वेबसाईटवर मात्र या ॲपची निर्मिती नॅशनल इन्फॉर्मेटेक सेंटर आणि आय.टी. मंत्रालयाने केळी असल्याचा उल्लेख आहे. सूचना आयोगाने या संदर्भात संबंधित विभागाला कारणे दाखवा नोटीसद्वारे विचारणा केलेली आहे की, या ॲपच्या डेव्हळपमेंटबाबत कोणतीही माहिती एनआयसीकडे का नाही? आयोगाने या संदर्भात अनेक चीफ पब्लिक इन्फॉर्मेशन अधिका-यांसहित नॅशनल ई-गव्हर्नंस डिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना मंत्रालय आणि एनआयसीला कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. या ॲपबद्दल माहिती न देणाऱ्यांवर कारवाई का केल्या जात नाही? माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई का करण्यात येत नाही ? नोटीस बजावल्यानंतर सरकारने मात्र हा ॲप पूर्णपणे पारदर्शी असल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. हा ॲप खासगी आणि सार्वजनिक (सीपीपी) भागीदारीतून विकसित करण्यात आलेला आहे. आरोग्य सेतू ॲपला एनआयसीने उद्योग आणि विशेष व्हॉलिंटिअर्सच्या संयुक्‍त विद्यमाने विकसित केले आहे.