स्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले

या नेत्यांपैकी कोणत्याही नेत्यांकडे पक्षाच्या स्टार प्रचारक पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. यावरून पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, या नेत्यांची निवडणूक प्रचारासाठी काहीही आवश्यकता नाही. नेत्यांनी विचारही केला नसेल की, आपण पक्षामध्ये ज्येष्ठ आणि अनुभवी असूनसुध्दा आपली अशाप्रकारे उपेक्षा केली जाईल.

  सोनिया गांधी यांना पत्र लिहून ते पत्र वृत्तपत्रांमधून प्रसिध्द करणाऱ्या काँग्रेसच्या जी -२३ नेत्यांना पक्षाने जोरदार झटका दिलेला आहे.

  ‘देशातील ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, परंतु या अनुषंगाने या नेत्यांना मात्र पक्षाने दूरच ठेवले आहे.

  या नेत्यांपैकी कोणत्याही नेत्यांकडे पक्षाच्या स्टार प्रचारक पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. यावरून पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, या नेत्यांची निवडणूक प्रचारासाठी काहीही आवश्यकता नाही. नेत्यांनी विचारही केला नसेल की, आपण पक्षामध्ये ज्येष्ठ आणि अनुभवी असूनसुध्दा आपली अशाप्रकारे उपेक्षा केली जाईल.

  या नेत्यांना निवडणुकीची कोणतीही जबाबदारी न सोपविणे म्हणजे त्यांचा मोठा अपमान आहे. पक्ष नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्‍त करणे या नेत्यांच्या अंगलट आलेले आहे. या २३ नेत्यांनी पक्षांतर्गत लोकशाही असावी ब अंतर्गत निवडणुकीची मागणी केली होती. २ वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर अजूनपर्यंत कोणाचीही निवड वा नियुक्‍ती करण्यात आलेली नाही.

  सोनिया गांधी ह्याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांची निबड करावी, यासाठी जी २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते, परंतु या पत्राला पक्षनेतृत्वाने आव्हानाच्या स्वरूपात घेतले. हे प्रकरण एवढ्यावरच संपले नाही तर गुलाम नवी आझाद यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा ६ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला, तेव्हा त्यांच्या राज्यसभेतील कार्याबद्दल आझाद यांची पंतप्रधानांनी स्तुती केली तेव्हा आझादांना भाजपा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवून फारुख आणि मेहबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध उमेदवार बनविण्याच्या तयारीत आहे, असे बोलले जात होते.

  ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन जेव्हा भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हासुध्दा काँग्रेसपक्षाला जोरदार धक्का बसला. बंगाल आणि आसामसारख्या महत्त्वाच्या राज्यातील काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमधून गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मनीष तिवारी, कपिल सिब्बळ आणि भूपिंदरसिंग हुड्डा यांची नावेही वगळण्यात आली आहेत. स्टार प्रचारकांच्या पहिल्या यादीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, नवज्योतसिंग सिध्दू आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसचे नेतृत्व जी-२३ नेत्यांना मात्र विश्‍वासात घेण्यास अनेच्छुक आहेत.