ईव्हीएमवरून काँग्रेस राष्ट्रवादी आमने-सामने

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी आहेत. विविध मुद्दयांवर या पक्षांच्या नेत्यांची मते किंवा विचार सारखेच असावे याची आवश्यकता नाही. प्रत्येकांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो.

    मतदान ईव्हीएमद्वारे करायचे की, मतपत्रिकाराद्वारे हा मुद्दा सध्या वादाचा ठरलेला आहे. खरं म्हणजे हा मुद्द उचलून धरण्याची सध्या कोणतीही आवश्यकता नव्हती. कारण महाराष्ट्रात एवढ्यात कोणत्याही निवडणुका नाही. काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारकडे मतपत्रिकांद्रारेच मतदान घेण्याची मागणी केली होती, त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, जगातील अनेक देशांनी मतदानासाठी ईव्हीएमचा वापर करणे बंद केले आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि बॅलेट पेपरचीही व्यवस्था करण्यात यावी. मतदारांना वाटेल त्या पद्धतीचा ते मतदानासाठी वापर करू शकतील. पटोलेंच्या या वक्तव्याच्या अगदी उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईव्हीएमवरच विश्‍वास व्यक्‍त केला आहे. ते म्हणाले की, राजकीय पक्ष निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सारा दोष ईव्हीएमलीच देतात, परंतु माझा मात्र ईव्हीएमवरच विश्‍वास आहे.

    राजस्थान आणि पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तेव्हा तेथे मतदान व ईव्हीएमद्वारेच घेण्यात आले होते. जेव्हा एखादा पक्ष निवडणुकीत बिजयी होतो, तेव्हा सर्वकाही ठीक होत असते, परंतु जेव्हा त्या पक्षाचा पराभव होतो, तेव्हा मात्र पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जाते. अजित पवारांच्या या वक्तव्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याचे माझे व्यक्तिगत मत आहे. परंतु मला वाटते प्रत्येकाला मतदान कोणत्या पद्धतीने करायचे याबाबत स्वातंत्र्य दिल्या गेले पाहिजे. अजित पवारांना ईव्हीएमद्वारे मतदान करणे आवडत असेल तर त्यांनी तसे करावे, परंतु ज्यांना मतपत्रिकाद्वारे मतदान करायचे आहे, त्यांना मात्र मतपत्रिकाही उपलब्ध करून दिल्या पाहिजे.

    विरोधी पक्ष मात्र नेहमीच असा आरोप करतात की, ईव्हीएममध्ये छेडछाड केल्या जाऊ शकते म्हणून केंद्र सरकारने मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केलेली आहे. बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसची आघाडी होती, तेव्हा त्यांनीही ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता. तेव्हा निवडणूक आयोगाने ईव्हीएम सुरक्षित असल्याचे म्हटले होते. अजित पवार आणि नाना पटोले यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याबाबत सहमती होईल