corona

संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १० लाखांच्या वर पोहोचलेली असून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. सरलेल्या आठवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत ८१ टक्के वाढ झालेली आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांत 'कोरोना महामारी सर्वाधिक वाढलेली आहे. अमरावती जिल्ह्यात ७ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

    विदर्भात कोरोनाची स्थिती गंभीर वळण घेत असून याला सर्वस्वी जनतेचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे. मागील वेळी लॉकडाऊनमध्ये जनतेला जो अनुभव आलेला आहे, त्यापासून जनतेने कोणताच धडा घेतला नाही, असे दिसून येते. अजूनही कितीतरी लोक मास्क लावत नाहीत आणि सुरक्षित अंतरही ठेवताना दिसत नाही. जणूकाही कोरोना महामारी आता पूर्णपणे संपलेली आहे, अशीच त्यांची वागणूक असते. यामध्ये राजकीय नेतेही मागे नाहीत. या काळातच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अनेक सभा, मेळावे व मोर्चे काढले.

    कित्येक लग्नसमारंभात मास्क न लावता लोक सहभागी होताना दिसून येतात. अशाप्रकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रसार होणारच. यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की, कोरोनाची लस आलेली आहे, परंतु सध्या ती लस केवळ आरोग्य कर्मचारी आणि पोलिस शिपायांनाच दिली जाणार आहे. कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतरही मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पाळन करणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेणे अत्यावश्यक आहे. जोपर्यंत जनतेकडून सहकार्य मिळणार नाही, तोपर्यंत कोरोनावर मात केल्या जाऊ शकणार नाही.

    जेथे कुठे सेल लावलेला असतो, तेथे तर लोकांची प्रचंड गर्दी असते. आता तर सर्वच वस्तू ऑनलाईन मागविता येतात, परंतु लोक तसे न करता सेलमध्ये प्रचंड गर्दी करतात. देशात महाराष्ट्राबगोबरच केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बाजारात लोकांची प्रचंड गर्दी असते. बसेस आणि ऑटोमध्येही लोकांची गर्दी पाहायला मिळते. यामध्ये एक व्यक्‍ती जरी कोरोनाबाधित असला तरी तो कितीतरी लोकांना बाधित करीत असतो. जेथे कुठे लॉकडाऊन संपलेला आहे तेथेसुद्धा सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.

    कोरोना केवळ बिमारीच नाही तर ातेनतुळे किक उद्योगधंदे बंद पडतात, परिणामी कामगार, मजूर होतात. गतवर्षी याचे दुष्परिणाम बघायला मिळाले आहेत. त्यामुळे आता प्रत्येकालाच सतर्क राहण्याची नितांत गरज आहे.