cm school Reopen

  • कोरोनामुळे मागील ४ महिन्यात सरकरारी विभागांना कोणतीही विकास कामे करता आली नाही. केवळ आरोग्य विभागाची कामे तेवढी झालेली आहेत. इतर विभागाच्या तुलनेत हा विभाग मात्र आवंटित रक्कम खर्च करण्यात आघाडीवर आहे. या विभागाने आवंटित करण्यात आलेल्या १०.८६ टक्के रक्कम खर्च केलेली आहे.

कोरोना महामारीमुले केवळ जनताच त्रस्त झालेली नाही तर सरकार आणि प्रशासनावरही कोरोनाचा विपरीत परिणाम झालेला आहे. सर्व काही ठप्प झालेले आहे. सरकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत, त्या यंत्रणांकडून कोणतीही कामे होताना दिसत नाही. विविध विभागासाठी अर्थसंकल्पात ज्या रकमेची तरतूद केलेली आहे, त्यातील ५ टक्केही रक्कम खर्च झालेली नाही. इ.स. २०२०-२१ मध्ये आवंटित रक्कम खर्च करण्यात सरकारी विभाग खुपच मागे पडलेले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वच कामे ठप्प झाल्यामुळे प्रशासनाचाही नाईलाज झालेला आहे. कोरोना महामारी लक्षात घेता सरकारने आवंटित करण्यात आलेल्या रकमेच्या ३३ टक्के खर्च करण्यात यावे, असे आदेश दिले होते, परंतु ही रक्कम सुद्धा खर्च करणे अशक्य झाले आहे. कोरोनामुळे मागील ४ महिन्यात सरकरारी विभागांना कोणतीही विकास कामे करता आली नाही. केवळ आरोग्य विभागाची कामे तेवढी झालेली आहेत. इतर विभागाच्या तुलनेत हा विभाग मात्र आवंटित रक्कम खर्च करण्यात आघाडीवर आहे. या विभागाने आवंटित करण्यात आलेल्या १०.८६ टक्के रक्कम खर्च केलेली आहे. ग्रामविकास विभागाने आंटित करण्यात आलेल्या रकमपैकी ९.११ टक्के रक्कम खर्च केली, तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या आभूतपूर्व आणि भीषण परिस्थितीमुळे जनजीवन नव्हे तर सरकारी कामकाजही प्रभावित झाले आहे. इतर वेळी सक्रीय राहणारे सरकारी विभाग केवळ नावापुरतेच काम करीत होते. शासन आणि प्रशासन सोशल डिस्टंन्सिंग आणि व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारेच सुरु होते. कोरोना संक्रमणापासून स्वतःला वाचविणे आणि इतरांचाही बचाव करणे यालाच प्राथमिकता देण्यात आली होती. सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोजकीच उपस्थिती होती. बहुतांश कर्मचारी घरीच राहत होते. केवळ आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अन्य आवश्यक सेवेतील कर्मचारीच कामावर होते. जोपर्यत परिस्थिती सामान्य होणार नाही, तोपर्यंत अशीत स्थिती राहणार आहे. इच्छा असूनही सरकारी विभागातील कर्मचारी काम करण्याच्या मनःस्थितीत नाही, ही वस्तुस्थिती आहे.