गोलमाल है भाई सब गोलमाल है! कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय?

कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी लसींचे २ डोस दिले जात आहेत. या दोन डोसमधील अंतर सुरुवातीला ४ आठवड्याचे ठेवण्यात आले होते. परंतु नंतर मात्र हे अंतर ६ आठवडे करण्यात आले.

    दोन डोसमधील अंतर किती कालावधीचे असावे हे कोण ठरवित असते? लसींचा पुरवठा आणि उपलब्धता लक्षात घेऊन हे ठरविण्यात येणार काय? लसींचा पुरवठा कमी झाल्यास दोन लसींमधील अंतर वाढविण्यात येत असावे. दोन लसी घेण्यामध्ये हा जो कालावधी देण्यात येतो, त्याला वैज्ञानिक आधार काय आहे?

    वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्‍सिनकरिता लस घेण्याचा कालावधी वेगवेगळा निर्धारित करण्यात आला आहे. गेल्या १६ जानेवारीला जेव्हा देशात पहिल्यांदा लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली तेव्हा कोविशिल्डच्या दोन लसी घेण्यामध्ये ४ ते ६ आठवड्यांचे अंतर ठेवण्यात आले होते. मार्च महिन्यात हेच अंतर ४ ते ८ आठवड्यांचे करण्यात आले. आता तर केंद्र सरकारने ‘एनटीएजीआय’च्या शिफारशीवरून दोन लसीमधील हे अंतर १२ ते १६ आठवडे केलेले आहे. याचा अर्थ असा की, दोन लसी घेण्यामध्ये आता ३ ते ४ महिन्याचे अंतर ठेवण्यात येईल.

    पहिली लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी भविष्यात ज्या अँटीबॉडी तयार होतात त्यासाठी अधिक वेळ ठेवावा लागतो. साधारणपणे ३-४ महिन्यापर्यंतचे अंतरही ठेवता येऊ शकेल. याबाबतीत अजूनपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काही लोकांना अशी शंका आहे की, पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस जर १२ ते १६ आठवड्यांच्या अंतराने घेतली आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरोना संक्रमित झाल्यास काय करायचे?

    कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी १२ ते १६ आठवड्यांचे अंतर ठेवणे हा कालावधी जास्त होत नाही का? जर हे योग्य असेल तर अगोदर कमी अंतर का ठेवण्यात आले होते? ही एक चांगली बाब आहे की, आगामी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान देशवासीयांना २१६ कोटी लसी मिळतील आणि २ ऐवजी ८ लसींचा पर्याय उपलब्ध असेल.

    Corona Vaccine Updates What is the basis of the distance between the two vaccines