हिमाचल प्रदेशात भ्रष्टाचार, भाजप अध्यक्षांचा राजीनामा

भारतीय जनता पक्ष व या पक्षाचे नेते स्वत:ला चारित्र्यसंपन्न असल्याचा नेहमीच दावा करतात. नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सिंद्धांतवादी पक्ष जर या देशात कोणता असेल तर तो भाजपच अहे, असे भासवण्याचा

 भारतीय जनता पक्ष व या पक्षाचे नेते स्वत:ला चारित्र्यसंपन्न असल्याचा नेहमीच दावा करतात. नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सिंद्धांतवादी पक्ष जर या देशात कोणता असेल तर तो भाजपच अहे, असे भासवण्याचा प्रयत्नही या पक्षाचे नेते करित असतात. परंतु भाजप नेते मात्र विसरले की, त्यांच्याय पक्षाचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण हे भ्रष्टाचारातून मिळालेल्या नोटा मोजताना पकडल्या गेले होते, आता हिमाचल आरोग्य सेवा भ्रष्टाचारप्रकरणी भाजपचे प्रदेश अध्यक्ष राजीय बिंदल यांनी राजीनामा दिला आहे. राजीव बिंदल यांची मुलगी आणि जावई सोलन येथे अॅपेक्स डायग्नोस्टिक ही कंपनी चालवितात. या कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर पृथ्वीसिंह आहेत. पृथ्वीसिंह आणि हिमाचल प्रदेश आरोग्य सेवा निर्देशक यांच्यामधील चर्चेची एक ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे. यामध्ये आरोग्य निर्देशकांना ५ लाख रुपये रिश्वत देण्यासंबंधीचे संभाषण आहे. यानंतर भ्रष्टाचारविरोधी ब्युरोने स्वास्थ निदेशकांना अटक केली व नंतर जामीनावर त्यांना सोडण्यात आले. यानंतरही पृथ्वीसिंहावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हिमाचलचे माजी मंत्री आणि नाहन विधानसभा मतदारसंघाचे सदस्य राजीव बिंदल यांच्याशी पृथ्वीसिंहांचे संबंध आहेत. बिंदल हे भाजपचे प्रदेशाध्यक्षही आहेत. अॅपेक्स डायग्नोस्टिकने सोलनमधून ६ ते ७ हजार पीपीई किट्स खरेदी करण्यात आल्या होत्या. पण ही कंपनी अस्तित्वातच नाही. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने सत्ताधारी भाजप सरकारवर या प्रकरणी जोरदार टीका केली आहे. देश कोरोनाशी लढत असताना राज्यातील सत्ताधारी भाजप मात्र भ्रष्टाचार करण्यातच व्यस्त आहे. याप्रकरणी सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणीही या पक्षांनी केली आहे. मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असताना व्यापमं घोटाळा झाला होता, माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे नाव टेलिकॉम घोटळ्यात आले होते. परंतु जेव्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा हे सर्व विसरुन त्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले होते. भाजप खरोखरच सिद्धांतवादी पक्ष असेल तर त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याचे कार्य करु नये.