ananya Birla

अनन्या बिर्ला यांच्यासोबत वॉशिंग्टन येथील स्कोपा इटालियन रेस्टॉरंटमध्ये नुकताच वर्णभेद करण्यात आला. अनन्या यांनी ट्विट केले की, या रेस्टॉरंटमधून परिवारासह आपल्याला बाहेर हाकलून देण्यात आले.

अमेरिकेमध्ये विविध वंशाचे लोक राहतात, यामध्ये युरोपियन वंशाच्या गो-या लोकाव्यतिरिकत आफ्रिकन अमेरिकन, भारतीय, हिस्पॅनियन, पोलिनिशियन, रेड इंडियन समुदाय इत्यादींचा समावेश आहे. तथापि, काही गौरवर्णीय मानसिकता ठेवतात. समान योग्यता असतानाही तेथे वेतनामध्ये भेदभाव केला जातो. तेथील काही संस्था गौरवर्णीयांना अन्य कुशल कर्मचा-यांपेक्षाही तुलनेत जास्त वेतन देतात. मार्टिन लूथर किंग यांच्या नागरी आंदोलनानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर यासंबंधाने सुधारणा झालेल्या आहेत, परंतु अजूनही तेथील अलाबामा, जार्जिया आणि लुईसियाना या राज्यांमध्ये वर्णभेद मात्र कायम आहेत. समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया जेव्हा अमेरिकेत गेले होते, तेव्हा त्यांना रेस्टॉरंटमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी या असमानतेविरुद्ध तेथे धरणे आंदोलन केले होते. मिसीसिपी येथे तर एकदा काळ्या लोकांची वस्ती पेटवून देण्यात आली होती. या घटनेला बराच काळ लोटल्यानंतरही अजूनसुद्धा तेथे वर्णद्वेषाची मानसिकता कायम आहे. मानवी प्रतिष्ठा जोपासण्याच्या अमेरिकेच्या मूळ तत्त्वापासून हा प्रकार विसंगत आहे. भारतातील सुप्रसिद्ध बिर्ला घराण्याच्या सदस्या अनन्या बिर्ला यांच्यासोबत वॉशिंग्टन येथील स्कोपा इटालियन रेस्टॉरंटमध्ये नुकताच वर्णभेद करण्यात आला. अनन्या यांनी ट्विट केले की, या रेस्टॉरंटमधून परिवारासह आपल्याला बाहेर हाकलून देण्यात आले. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सभ्यपणाची वागणूक दिल्या गेली पाहिजे. आपल्या आईसोबतही वेटरने असभ्य व्यवहार केल्याचे अनन्या यांनी सांगितले. याशिवाय विदेशात केव्हा कशी परिस्थिती निर्माण होईल, हे सांगता येत नाही. बिर्ला परिवार भारतातील मोठे उद्योगघराणे आहे, परंतु प्रत्येक विदेशी नागरिकांना या घराण्याविषयी माहिती असेलच असे नाही. अमेरिकेमध्ये अजूनही काही ठिकाणी त्वचेचा रंग बघून भेदभाव केला जातो. आम्हालाही बुद्धिपुरस्सर त्या हॉटेलमध्ये ३ तास ताटकळत थांबून राहावे लागले, या घटनेची जेवढी निंदा करावी तेवढी थोडीच आहे. हे प्रकरण अमेरिकेतील भारतीय दूतावासाने लावून धरले पाहिजे. वर्णभेदाची मानसिकता जोपासणाऱ्यांना धडा शिकविण्याची नितांत गरज आहे.