indian army

चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूची बाब कबूल केलेली नाही. चीनसाठी आपल्या जवानांच्या प्राणांचे काहीही मोल नाही. तिथे लोकांना जबरदस्तीने सैन्यात सामील करण्यात येते. याउलट भारतीय जवान देशभक्तीच्या भावनेने लष्करात स्वेच्छेने सहभागी होतो.

चीनने भारताजवळील सीमेवर युद्धाभ्यास सुरु केला आहे. व अनेक चर्चांनंतरदेखील चिनी सैन्य मागे हटून एलएसीवर मे महिन्याच्या पूर्वीच स्थिती बहाल करत नाही. तिबेटच्या नंतर लडाखवर कब्जा करण्याचा चीनचा कट आहे. गलवान खोऱ्यात चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने धुडकावून लावला होता. या झटापटीत आपले २० जवान शहिद झाले होते. तर चीनचे १०० जवान मारले गेले होते. चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूची बाब कबूल केलेली नाही. चीनसाठी आपल्या जवानांच्या प्राणांचे काहीही मोल नाही. तिथे लोकांना जबरदस्तीने सैन्यात सामील करण्यात येते. याउलट भारतीय जवान देशभक्तीच्या भावनेने लष्करात स्वेच्छेने सहभागी होतो. चीन भारताशी तणावाच्या मार्गाने पुढे वाटचाल करीत आहे. तो आपल्या अरुणाचल प्रदेशालाही स्वतःचे सांगत हा दक्षिणी तिबेटचा भाग असल्याची वल्गना करीत आङे. चिनी सैन्याने अरुणाचल केंद्र भारतीय भागांचे अपहरण केले आहे. चीन फक्त भारताच नव्हे तर संपूर्ण जगावर वर्चस्व दाखविण्यासाठी अशा नीच कर्मांवर उतरला आहे. तो हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थक आंदोलनकर्त्यांवर अत्याचार व अटक करीत आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नौसेना व्हिएतनाम, कंबोडिया या देशांसाठी धोका निर्माण करीत आहे. चीनने भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा कुटिलपणा दाखवला, नेपाळ श्रीलंका, मालदीव, बांगलादेश यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु लंकेने स्पष्ट केले की, भारताशी तो जुने संबंध कायम ठेवेल. मालदीवदेखील चीनच्या कचाट्यातून सुटला. नेपाळने चीनच्या इशाऱ्यावर भारताच्या भागातील काही क्षेत्राला आपल्या नकाशावर दाखविण्याचे दुःसाहस केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षणमंत्री वेई फैंगला स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारताशी नडण्याची चूक करु नका. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वांगयी यांच्याशी पुन्हा चर्चा होणार आहे. परंतु, चीन आपल्या हरकतींपासून सुधारताना दिसत नाही. चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पुन्हा पुन्हा म्हटले आहे की, चीन भारतापेक्षा अधिक शक्तिशाली आहे तसेच चीनजवळ अनेक मोर्चांवर लढण्यासाठी सैन्यशक्ती आहे.