जीडीपीमध्ये विक्रमी घसरण, अर्थमंत्री सीतारामण यांनी दिली कबुली

अधिक उत्पादन झाल्यास खाद्यान्नाची निर्यात केली जावू शकेल, यावर भर देण्यात आला. आम्ही देशातील गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी मूलभूत ढाच्यावर अधिक खर्च करीत असतो.

सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षांमध्ये जीडीपीचा दर (GDP Rate) नकारात्मक किंवा शून्याच्या जवळ पोहचू शकतो, अशी कबुली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman)  यांनी दिली आहे. अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, इ.स. २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेत २३.९ टक्के घसरण (Decline ) झालेली आहे, त्यामुळे या वित्तीय वर्षांमध्ये जीडीपी वृद्धीदर नकारात्मकच राहिलेला आहे. तिस-या आणि चौथ्या तिमाहीमध्ये काही सुधारणा झाल्यानंतरही हा दर मात्र नकारात्मकच राहणार आहे. यानंतरही अर्थमंत्री सीतारामण यांनी पुढी वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत निश्चित सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्तत केली आहे.

अर्थव्यवस्थेत सुधारणा करणा-या देशामध्ये भारताचा क्रमांक असेल, असेही त्या म्हणाल्या. आता तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अनुमानानुसार संपूर्ण आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ९.५ टक्क्यांवर येण्याचे अनुमान व्यक्तस करण्यात येत आहे. सीतारामण यांनी भारतीय ऊर्जा विभागाला संबोधित करताना म्हटले आहे की, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनपूर्वी या आर्थिक वर्षाचा विकासदर ४.२ टक्क्यापर्यंत घसरला होता. २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला. अत्यावश्यक सेवांना प्राथमिकता देणे आवश्यक असल्यामुळे यावरील खर्चाला प्राधान्य देण्यात आले.

दुसरी प्राथमिकता खाद्यान्न, फळे, भाज्या यांच्या उत्पादनाला देण्यात आली. अधिक उत्पादन झाल्यास खाद्यान्नाची निर्यात केली जावू शकेल, यावर भर देण्यात आला आहे. आम्ही देशातील गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी मूलभूत ढाच्यावर अधिक खर्च करीत असतो. यामुळे कृषी उत्पादनाची निर्यात वाढू शकेल. फूड प्रोसेसिंग आणि कोल्ड स्टोअरेजचा संपूर्ण ढाचा सुधारण्याची आवश्यकता आहे. कोरोना महामारी असतानासुद्धा ज्या कंपन्यांचे ग्लोबल स्टँडर्ड होते त्या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य देण्यात आले. भारतामध्ये कंपनी कर कमी असल्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यामध्ये विदेशी गुंतवणुकीमध्ये १३ टक्के वाढ झालेली आहे.

सणावारांच्या हंगामामध्ये मागणी वाढत असल्यामुळे घरेलू उत्पादनामध्ये वृद्धी होण्याची शक्याता आहे. कृषी आणि ग्रामीण विभागाशी संबंधित प्राथमिक सेक्टरमध्ये सध्या चांगले कार्य सुरू आहे. टिकाऊ वस्तू, कृषी अवजारे आणि वाहनांची मागणी वाढलेली आहे. कोरोना पूर्वीच्या काळाच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात इंधन आणि विजेची मागणी वाढलेली आहे.