हुकूमशहा किम जोंग कोमात बहीण सांभाळणार कारभार

किम जोंग आजारी पडल्यानंतर त्यांची बहीण कीम यो-जोंग देशाचा सर्व कारभार सांभाळत होती. त्यांची बहीण यो-जोंग ही किमपेक्षाही जहाल आणि निर्दयी आहे, असे बोलल्या जात आहे. तिच्या हातात उत्तर कोरियाची सत्ता आली तर ती किमपेक्षाही कठोर सिद्ध होईल.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग खूप आजारी असून ते सध्या कोमात आहेत. कोमातून ते बाहेर येतील किंवा नाही, याबद्दल शंकाच आहे. किम जोंग कोमात गेलेले आहेत यावर यासाठी विश्वास ठेवला जात आहे की, ही बातमी चीनच्या सूत्राकडून मिळालेली आहे. चीन आणि उत्तर कोरियामध्ये दृढ मैत्री असल्यामुळे पाश्चिमात्य देश हा अपप्रचार करीत आहे. म्हणून ही बातमी फेटाळू शकत नाही. कोरियाच्या या हुकूमशहाने त्यांच्या देशातील गरिबी आणि उपासमारीकडे दुर्लक्ष करुन मिसाईल आणि परमाणू शस्त्रांची निर्मिती केली आहे. किम जोंग अमेरिकेला सतत धमकी देत होते. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि किम जोंग यांच्यामधील भांडण सतत चर्चेत राहिलेला आहे. किम यांनी अमेरिकेच्या शहरावर बॉम्ब हल्ले करण्याची धमकी दिली होती. अमेरिकेला दक्षिण कोरियामध्ये असलेल्या त्यांच्या सैनिकी तळांची चिंता होती. इ.स. १९५० प्रमाणे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये पुन्हा युद्ध सुरु होईल, याची चिंता अमेरिकेला होती म्हणून ट्रम्प यांनी हा तणाव कमी करण्यासाठी किम जोंग सोबत चर्चाही केली होती. किम जोंगला विरोध करण्याची हिंमत त्यांच्या देशातील कोणत्याही नेत्यांमध्ये नाही. त्यांना विरोध करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होय. उत्तर कोरियातून भूख आणि बेकारीला जे तरुण दक्षिण कोरियाकडे परत येत होते. त्यांना किम जोंग यांनी ठार केरे आहे. २ मे रोजी एका कारखान्याचे उद्घाटन करताना किम जोंग यांना बघितले होते. यापूर्वी त्यांनी ११ एप्रिल रोजी वर्कर्स पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले होते. किम जोंग आजारी पडल्यानंतर त्यांची बहीण कीम यो-जोंग देशाचा सर्व कारभार सांभाळत होती. त्यांची बहीण यो-जोंग ही किमपेक्षाही जहाल आणि निर्दयी आहे, असे बोलल्या जात आहे. तिच्या हातात उत्तर कोरियाची सत्ता आली तर ती किमपेक्षाही कठोर सिद्ध होईल. उत्तर कोरिया, चीन, पाकिस्तान, इराण आणि तुर्कस्थान या देशामध्ये आपसाच योग्य ताळमेळ आहे. या देशाची भूमिका अमेरिका आणि पश्चिमी राष्ट्रांच्या विरोधात आहे. उत्तर कोरियाने पाकिस्तानला हत्फ मिसाईल दिले होते. ज्यांना त्यांनी घोरी आणि गजनवी यांची नावे दिली होती. दक्षिण कोरियाच्या नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसने काही दिवसापूर्वी अशी घोषणा केली होती की, किम जोंग आपले पूर्ण अधिकार आणि जबाबदारीने त्यांच्या सर्वात भरवशाच्या सहकाऱ्यांना सहकार्य करेल. किम जोंग यांची उत्तराधिकारी म्हणून त्यांची बहीण आता देशाची कारभार सांभाळेल.