राजधानी दिल्लीला भूकंपाचा धोका

महराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरातला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने तेथील स्मरण करुन दिले आहे. तेव्हा भूजमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथून ३०० किलोमीटरवर असलेल्या अहमदाबाद शहराचे प्रचंड नुकसान

 महराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरातला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने तेथील स्मरण करुन दिले आहे. तेव्हा भूजमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथून ३०० किलोमीटरवर असलेल्या अहमदाबाद शहराचे प्रचंड नुकसान झाले होते. रविवारला राजकोटमध्ये झालेल्या भूकंपाचे तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ होती त्यानंतर सोमवारी गुजरामध्ये भूकंपाचे १४ हादरे बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छपासून १५ किलोमीटर अंतरावर होता. देशाचा उत्तर भाग हा फॉल्टलाईन क्षेत्रात येतो त्यामुळे या क्षेत्राला धोका असते. जेव्हा भूगर्भामध्ये टेक्टानिक प्लेट्सची एकमेकांशी टक्कर होते. तेव्हा भूकंप होत असतो. जेव्हा या भूकंपाची तीव्रता वाढते तेव्हा महाविनाश होतो. इ.स.२०१५ ला नेपाळला विनाशकारी भूकंपाचा धक्का बसला होता. धनबाद येथील आयआयटीच्या वैज्ञानिकांनी राजधानी दिल्ली आणि परिसरात प्रचंड तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता वर्तविली आहे. आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनीही दिल्ली-हरिद्वार दरम्यान मोठ्या भूकंपाची शक्यता असल्याचे भाष्य केले आहे.

वाडिया इनस्टिट्यूट ऑफ हिमलयीन जिऑलॉजीचे प्रमुख डॉ. कलाचंद जैन यांनी दिल्ली आणि परिसरात भूगर्भामध्ये सारख्या हालचाली सुरु असल्याचे म्हटले आहे. सीस्मिक अॅक्टव्हिटीमुळे दिल्लीमध्ये मोठा भूकंप येण्याची शक्यताही वर्तविली आहे. आता जर ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तर प्रचंड नुकसान होऊ शकते. परंतु भूकंप कोठे आणि केव्हा होईल याची बिनचूक भविष्यवाणी करता येउ शकत नाही, तथापि सॅटेलाईट आणि अन्य वैज्ञानिक परीक्षणातून भूकंपाची शक्यता मात्र वरितविली जाऊ शकते. भारत आणि वैज्ञानिक परीक्षणातून भूकंपाची शक्यता मात्र वर्तविली जाऊ शकते. भारत आणि तिबेट परिसरात भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २० स्थायी जीपीएस स्टेशन स्थापन करण्यात आलेले आहेत. दिल्लीला तर वर्षभरातून अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. गेल्या आठवडाभरात जम्मू-काश्मीर, गुजरात, अंदमान-निकोबार, दिल्ली, फरिदाबाद व रोहतकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. संवेदनशील क्षेत्रात तर भूकंपाचा लहानसा धोका सुद्धा मोठ्या भूकंपाचे कारण ठरु शकतो. गेल्या दोन महिन्यात दिल्लीला १० वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या २४ तासात जगातील अनेक देशांमध्ये १६३ वेळा भूकंपाचे धक्के बसले. जपान, इंडोनेशिया, तुर्कस्थान, इराण हे देश भूकंपप्रवण क्षेत्रात येतात.