राहुल-प्रियंका यांच्या सक्रियतेनंतरही उत्तरप्रदेशात काँग्रेसने एक जागा गमावली

पक्षाच्या एका उमेदवाराने काळजीपूर्वक नामांकन अर्ज न भरल्यामुळे निवडणुक अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज रद्द केला. उत्तर प्रदेश मधील फिरोजाबाद जिल्ह्यातील टूंडाला मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार स्नहलता यांचा नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने रद्द केला आहे. त्यांनी नामांकन अर्जातील प्रतिज्ञापत्राचा रकाना पूर्णपणे भरला नव्हता. न भरता तो रकाना रिकामाच सोडून देण्यात आला होता.

जर काँग्रेसचे (Congress) नेते आणि कार्यकर्ते काळजीपूर्वक कामे करीत नसतील तर राहूल (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priynka Gandhi) यांची सक्रियतासुद्धा उपयोगाची ठरणार नाही. नेतृत्व योग्य मार्गदर्शन करु शकेल, परंतु काळजीपूर्वक कामे तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच करावी लागतील. पक्ष नेत्यांच्या निष्काळजीपणामुळे उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुकीपुर्वीच काँग्रेसला एक जागा गमवावी लागली. पक्षाच्या एका उमेदवाराने काळजीपूर्वक नामांकन अर्ज न भरल्यामुळे निवडणुक अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज रद्द केला. उत्तर प्रदेश मधील फिरोजाबाद जिल्ह्यातील टूंडाला मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार स्नहलता यांचा नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने रद्द केला आहे. त्यांनी नामांकन अर्जातील प्रतिज्ञापत्राचा रकाना पूर्णपणे भरला नव्हता. न भरता तो रकाना रिकामाच सोडून देण्यात आला होता. स्नेहलता यांनी त्यांच्यावर आश्रित कुटुंबातील परिवारजणांचा रकाना रिकामाच सोडला होता. हा रकाना तर रिकामा सोडलाच, परंतु अनेक रकाने कोणतीही माहिती न भरता रिकामे सोडण्यात आले होते. याशिवाय स्नेहलता यांनी फिरोजाबाद जिल्हा प्रशासनावर बेईमानीचे आरोप केले होते. १४ ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या नामांकन अर्जात त्रुटी असल्यामुळे १६ ऑक्टोबर रोजी त्या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या होत्या. असे स्नेहलता यांनी म्हटले आहे. या मतदारसंघातून आपण एकमात्र स्थानिक उमेदवार होते. व इतर सर्व उमेद्वार बाहेरचे होते. त्यामुळे या मतदारसंघात आपला विजय निश्चित होते. असा दावाही त्यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्याने आपण दिलेल्या प्रतित्रापत्रातील पाने बदल्याचा आरोप त्यांनी केला. स्नेहलता यांना ३ वेळा बोलावून सांगण्यात आले की, त्यांचा अर्ज अपुरा आहे. परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. या साऱ्या घटनाक्रमाचे व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले आहे. जर स्नेहलता यांचा दावा खरा होता तर त्यांनी न्यायालयात आव्हान का दिले नाही. हे स्पष्ट आहे की, स्नेहलता यांनी अर्ज भारताना चूक केलेली आहे. त्यांची ही चूक पक्षाला खूप महागात पडली आहे. निवडणूक न लढताच एक जागा पक्षाला गमवावी लागली. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. खरं म्हणजे नामांकन अर्ज भरताना उमेद्वार एकापेक्षा जास्त अर्ज दाखल करीत असतात. परंतु स्नेहलता यांनी तसे न केल्यामुळे पक्षाला ही जागा गमवावी लागली.