income tax department

आयकर विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये त्याने आतापर्यंत कमावलेल्या सर्व बेहिशेबी संपत्तीचे दस्तावेज जप्त करण्यात आले. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाच्या अधिकाऱ्यांना या धाडीमध्ये एक असे प्रकरण सापडले की, या व्यक्तीने ते प्रकरण रफादफा करण्यासाठी ११७ कोटी रुपये नगदी फी घेतली होती, परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ २१ कोटी रुपये फी घेतल्याच्या चेकची नोंद आहे.

काही वकील असे असतात की, त्यांना फारसे कायद्याचे ज्ञान नसते, परंतु नशीब मात्र फारच बलवत्तर असते. कोणतेही प्रकरण मॅनेज करण्यात ते माहीर असतात. यातूनच ते खूप कमाई करतात. (Expensive lawyer) असाच एक वकील आयकर विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. आयकर विभागाने ( income tax department) त्यांच्या पक्षकारांकडून २१७ कोटी रुपये फी घेणाऱ्या चंदीगडच्या एका वकिलाच्या दिल्ली एनसीआर आणि हरयाणातील ३६ ठिकाणी धाडी टाकल्या. या वकिलाचे १० बँक लॉकरही सील करण्यात आले आहेत. हे वकील महोदय वकिली कमी आणि दलाली जास्त करत होते. न्यायालयाच्या बाहेरच मध्यस्थी करुन ते अनेक प्रकरणं निकालात काढत होते. हे वकील त्यांच्या आशीलाकडून वादग्रस्त प्रकरण निकालात काढण्यासाठी मोठी फी घेत होते. आयकर विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये त्याने आतापर्यंत कमावलेल्या सर्व बेहिशेबी संपत्तीचे दस्तावेज जप्त करण्यात आले. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाच्या अधिकाऱ्यांना या धाडीमध्ये एक असे प्रकरण सापडले की, या व्यक्तीने ते प्रकरण रफादफा करण्यासाठी ११७ कोटी रुपये नगदी फी घेतली होती, परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ २१ कोटी रुपये फी घेतल्याच्या चेकची नोंद आहे. दुसऱ्या एका प्रकरणात इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंजिनिअरिंग कंपनीकडून फी पोटी १०० कोटी रुपये रोख स्वरुपात घेतले होते. या वकिलाने बेहिशेबी रकमेतून अनेक बंगले आणि व्यावसायित संपती खरेदी केली होती. असे प्रत्यक्ष कर विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले. याशिवाय एक शाळा संचालित करणाऱ्या ट्रस्टवरही वकिलाने कब्जा केला होता. गेल्या दोन वकिलाने १०० कोटीची संपत्ती विकत घेतल्याचेही पुरावे मिळालेले आहेत. सरळ मार्गाने वकिली करणारा वकील इतकी मोठी संपती कमावूच शकत नाही. या वकिलाने सरकारी कार्यालयात नक्कीच सेटींग केली असणार. हे वकील त्याच्या अशीलाकडून कमिशन वसूल करीत होते. इतकी मोठी संपत्ती वकिली करुन कोणताही वकील कमावू शकत नाही. या प्रकरणाची आयकर विभागाने सखोल चौकशी केल्यानंतर आणखी बरेच काही उघड होऊ शकेल.