मोठ्या धरणांमुळे महाप्रलयाचा धोका

 विकासाच्या नावावर पर्यावरणाकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येते. पर्यावरण शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशा-यांकडे कानाडोळा करण्यात येतो. सरकार जेव्हा कोणत्याही प्रकल्पाची रूपरेषा वा आराखडा तयार करते, त्यावेळी भूगर्भशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ आणि जनतेची मते लक्षात घेतली पाहिजे.

    जल पुरूष या नावाने प्रसिद्ध असलेले मॅगॅसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ‘जलप्रलयामुळे जे नुकसान झालेले आहेत. त्याचे कारण अलकनंदा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणामुळेच झाले असे मानतात. जर सरकारने या ‘जलप्रकल्पापासून काही धडा घेतला नाही तर भविष्यात महाप्रलयाचा सामना करावा लागेल, असा इशाराही राजेंद्रसिंहांनी दिलेला आहे. पहाडांमध्ये हिमकड्यांच्या जवळ ऋषिगंगा धरण बांधणेच चुकीचे होते. नैसर्गिकदृष्ट्या सरकारचा हा निर्णय योग्य नव्हता. सरकारवर विकासाची महत्वाकांक्षा झालेली असते, त्यामुळे सरकार शास्त्रज्ञांच्या सूचनांचीही अवहेलना करतात. त्या सूचना मानण्यास सरकार तयारच नसते. उत्तराखंडमध्ये चारधाम तीर्थयात्रा पूर्वापार चालत आलेली आहे.

    आता मात्र सुरूंग लावून बर्फाचे मोठमोठे कडे तोडले जात आहेत. बर्फ फोडून सिमेंट रस्ते बनविण्यात येत आहेत. तीर्थयात्रेची ठिकाणे पर्यटनस्थळं होऊ लागली आहेत. ‘नवीन-नवीन हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यात येत आहे. व्यवसायीकरण करण्यात येत आहे. विकासाच्या शर्यतीत हिमालयाच्या सुरक्षेकडे दूर्लक्ष होत आहे . पर्यावरणाच्या सुविधा निर्माण करताना निसर्गाची सुरक्षा नजरेआड करण्यात येत आहे. राजेंद्रसिंह यांनी म्हटले आहे की, अलकनंदा, मंदाकिनी आणि भागिरथी या नद्यांचा प्रवाह अवरोध करता कामा नये. या नद्यांवर धरणं बांधली तर या नदयांचा पाण्याचा बर्फ बनून तो धोकादायक ‘ठरू शकतो.

    जलप्रलयाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. मोठी धरणं दीर्घकाळानंतर निरूपयोगी ठरतात कारण त्यामध्ये दगड आणि माती जमा होत असते. सुद्धा हुवर धरण आणि टेनेसी व्हॅली धरण बांधणे थां आहे. याशिवाय हिमालयातील बर्फामध्ये मोठा जलसाठा सहन करण्याची शक्‍ती नाही. हिमालयात नेहमी भूस्खळन होत असते. हिमकडे बितळल्यामुळे धरणांची भिंत तुटली तर मोठा जलप्रलय होऊ शकतो. केदारनाथमध्ये इ.स. 2013 मध्ये याची प्रचिती आली. ‘जर क्रषिगंगा नदीवर मोठे धरण बांधण्यात आळे असते तर या धरणात साठलेल्या पाण्यामुळे उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशातील कितीतरी विभाग वाहून गेले असते.