लॉकडाऊनमुळे रेल्वेला आर्थिक फटका

एप्रिल महिन्यात ५३१.१२ कोटी रुपये. मे महिन्यात १४५.२४ कोटी तर जून महिन्यात रेल्वेचे ३९०.६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वेला एकूण १,०६६ कोटी रुपये प्रवाशांना परत करावे लागले. रेल्वेच्या अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे झालेले आहे. रेल्वेमधून प्रत्येकवेळी साधारणपणे १ कोटी लोक प्रवास करीत होते.

राष्ट्राची जीवनरेषा समजली जाणारी रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे प्रवासी भाड्यामधून होणारी कमाई बंद झाली आहे. देशात बुलेट ट्रेन सुरु करण्याचे स्वप्न दाखविल्या जात होते, परंतु मागील काही महिन्यापासून सामान्य रेल्वेगाड्याही बंद करण्यात आलेल्या आहेत. रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याच्या योजना कागदावरच राहिल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेला मिळकतीपेक्षा जास्त रक्कम प्रवशांना परत करावी लागली. कोरोना महामारीमुळे रेल्वेचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. अनेक प्रवाशांनी अॅडव्हान्स बुकिंग केलेली आहे. परंतु रेल्वेचे बंद करण्यात आल्यामुळे अॅडव्हान्स बुकिंगची रक्कम प्रवाशांना परत करावी लागली. एप्रिल महिन्यात ५३१.१२ कोटी रुपये. मे महिन्यात १४५.२४ कोटी तर जून महिन्यात रेल्वेचे ३९०.६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वेला एकूण १,०६६ कोटी रुपये प्रवाशांना परत करावे लागले. रेल्वेच्या अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे झालेले आहे. रेल्वेमधून प्रत्येकवेळी साधारणपणे १ कोटी लोक प्रवास करीत होते. परंतु रेल्वेच बंद करणयात आल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. त्यामुळे आता रेल्वे कर्मचाऱ्यांपुढे बेकारीचे संकट उभे ठाकले आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी मजुरांना त्यांच्या गृहराज्यात पोहोचण्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. यामध्येसुद्धा रेल्वेचे २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ज्या रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरुन धावत होत्या, त्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन बसविण्यात येत होते. त्यामुळे प्रवासी संख्या कमी राहत होती. यापूर्वीसुद्धा रेल्वेची आर्थिक परिस्थिती फायदेशीर नव्हतीच. रेल्वे ट्रॅकचा विस्तार, सुविधायुक्त रेल्वे डब्यांची निर्मिती, नवीन पूल बांधणे इत्यादी कामे रेल्वे विभागाला करायची होती. रेल्वेच्या सुविधा आणि सुरक्षित प्रवासाबाबत रेल्वेप्रवाशांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात मालभाड्यातूनच रेल्वेची काही मिळकत होत होती. एप्रिल महिन्यात ५७४४ कोटी रुपये, मे महिन्यात ७२८९ तर जून महिन्यात मालभाड्यापोटी ८७०६ कोटी रुपये रेल्वेची मिळकत झाली. परंतु हे उत्पन्न पुरेसे नाही. जेव्हा प्रवासी गाड्या बंद असतात तेव्हा रेल्वे नेहमीच तोट्यात असते.