maridona

१० नंबरची जर्सी घालणा-या या खेळाडूला गोल्डन बॉय' असे म्हटल्या जात होते. मॅराडोना फुटबालचा जादूगार होता. 'फुटबॉलच त्याच्या इशा-यावर नाचत होता. इ.स. १९८० मध्ये इंग्लड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात मराडोनाने जो दुसरा गोल केला होता, त्याला 'फिका'ने गोल ऑफ सेंच्युरी म्हटले होते.

जागतिक फुटबॉलमध्ये (Football ) ब्राझीलचा पेले आणि अर्जेटिनाचा दिएगो मॅराडोना हे दोघे मोठे खेळाडू होते. मॅराडोनाचा खेळ चमत्कारी होता. ५ फूट ४ इंच उंची असलेल्या कुरळ्या केसांच्या मॅराडोनाने इ.स. १९८६ च्या जागतिक फुटबॉल स्पर्धेत एकट्यानेच अर्जेटिनाला विजय मिळवून दिला होता. इ.स. २००० मध्ये फिका’ने पेले आणि मॅराडोना यांना फुटबॉलचे महान खेळाडू म्हणून घोषित केले होते. (Football loses Hand of God) मॅराडोनाचा खेळ आश्चर्यकारकच होता. जागतिक महान फुटबॉल खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविल्यानंतर मॅराडोनामध्ये मात्र ‘नैराश्य’ (डिप्रेशन) आले होते. मॅराडोनाचा ६० वा वाढदिवस साजरा झाल्यानंतर तिस-याच दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

डिप्रेशन, डिहायड्रेशन आणि एनिमियाने तो पीडित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फुटबॉल खेळताना त्याच्या डोक्याला जखम झाली होती. या जुन्या जखमेमध्ये रक्‍त जमा झाले होते. मॅराडोना डग आणि मद्याच्या आहारी गेला होता. एप्रिल २००४ मध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की, त्याचे हृदय कमजोर झालेले असून त्याला श्‍वास घेण्यास त्रास होतो आहे. मानसिक चिकित्सेसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो हवाना (क्यूबा) येथे नशामुक्‍तीसाठी उपचार करण्यासाठी गेला होता. एका महान खेळाडूची अशी अवस्था होणे ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. १० नंबरची जर्सी घालणा-या या खेळाडूला ‘गोल्डन बॉय’ असे म्हटल्या जात होते. मॅरडोना फुटबालचा जादूगार होता.

फुटबॉलच त्याच्या इशा- यावर नाचत होता. इ.स. १९८० मध्ये इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात मॅराडोनाने जो दुसरा गोल केला होता, त्याला ‘फिका’ने गोल ऑफ सेंच्युरी म्हटले होते. त्याचा पहिला गोल ‘हँड ऑफ गॉड’ या नावाने ओळखला जातो. अर्जेटिनासाठी मॅराडोना ९१ वेळा फुटबॉल खेळला. यामध्ये त्याने ३४ गोल केले होते. १६ विश्वकप सामन्यात त्याने कर्णधारपद भूषविले होते. हा सुद्धा एक रेकॉर्डच आहे. मॅराडोना त्याच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल संतुष्ट राहत होता. फुटबॉलप्रेमींच्या चेह-यावर हास्य फुलविण्यात मला आनंद होत होता. सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू पेले को मी यावर कोणताही वादविवाद नसल्याबद्दल मी समाधानी आहे, असे तो म्हणायचा. आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात मॅराडोनाची २० व्या शतकातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली होती.