honey

भारतीय खाद्य सुरक्षा प्राधिकरणाने राज्यांच्या ड्रग अॅन्ड फूड आयुक्तांना यासंबंधी माहिती दिली असतानाही केंद्र आणि राज्यांच्या लेबॉरेटरींनी मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. या कंपन्यांच्या मधाचे एनआरएम परीक्षण करणे सक्तीचे का करण्यात आले नाही.

देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ असल्याचे उघडकीस आले आहे. या कंपन्यांच्या मधामध्ये ‘शुगर सिरप’ भेसळ करण्यात येते, असे सेंटर फॉर सायन्स अँन्ड एनव्हायरमेंटने नमूद केले आहे. या कंपन्यांच्या मधाचे सर्व नमुने न्यूक्लिअर मॅग्नेटिक रिजोनंस टेस्ट (एनआरएम)च्या परीक्षणांमध्ये अयोग्य ठरले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात या कंपन्यांच्या मधाची निर्यात करण्यापूर्वी एनआरएम परीक्षण अनिवार्य केले होते, जेणेकरून भेसळयुक्त मधाची निर्यात होऊ नये. जर सरकारने विदेशात निर्यात करण्यात येणाऱ्या मधाची चाचणी अनिवार्य केलेली आहे, तर मग तोच मध देशामध्ये विकण्यासाठी योग्य कसे ठरविण्यात आला आहे? सरकारला माहीत होते की, या कंपन्या मधामध्ये भेसळ करण्याचा गोरखधंदा करीत आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा प्राधिकरणाने राज्यांच्या ड्रग ॲन्ड फूड आयुक्तांना यासंबंधी माहिती दिली असतानाही केंद्र आणि राज्यांच्या लेबॉरेटरींनी मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. या कंपन्यांच्या मधाचे एनआरएम परिक्षण करणे सक्तीचे का करण्यात आले नाही. या मधामध्ये ८० टक्के भेसळ असतानाही या कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. चीनमधून आयात केलेल्या शुगर सिरपची मधामध्ये भेसळ करण्यात येते. परंतु भारतात जे परीक्षण करण्यात येते, त्यामध्ये या शुगर सिरपचे तत्त्व मात्र सापडतच नाही.

उत्तराखंड येथील एका कारखान्यात तयार झालेल्या मधामध्ये ५० टक्के भेसळ करण्यात आली होती, परंतु भारतात करण्यात आलेल्या परीक्षणामध्ये मात्र त्या मधामध्ये कोणतीही भेसळ केल्याचे निदर्शनास आले नाही. आता मध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी बचावात्मक पवित्रा घेतलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एकफएसएसआयने सेंटर फॉर सायन्स अँन्ड एनव्हायरमेंट (सीएसई)ला चौकशीचे विवरण मागितले आहे. सीएसईने त्यांच्या तपासामध्ये मोठ्या मध निर्मात्या कंपन्यांच्या १० मधाच्या ब्रँडमध्ये भेसळ असल्याचा दावा केलेला आहे. मोठ्या कंपन्यांच्या भारतीय बाजारात विकण्यात येणाऱ्या १३ प्रमुख ब्रँडचे सीएईच्या खाद्य विशेषज्ञांनी परीक्षण केले होते. एपिस हिमालय या कंपनीच्या मधाला सोडून इतर सर्व प्रकारचे मध मात्र परीक्षणांमध्ये योग्य ठरले आहेत.