गुजरातपासून मणिपूरपर्यंत महिला पोलिस व नेता आमने-सामने

  • लॉकडाऊनच्या काळात राज्यमंत्र्यांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत नाईट कर्फ्युचे उल्लंघन करीत फिरत होता. सुनिता यादव यांच्या विरोधात मात्र चौकशी सुरु झाली. लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करणे कॉन्स्टेबल सुनिताच्या अंगावर आले. यांना धमकीही देण्यात आली. याचप्रमाणे मणिपुरच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी थोउनाओजम वृदा यांनी उच्च न्यायलायात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असून या प्रतिज्ञपत्रात त्यांनी मुख्यमंत्री वीरेंद्रसिंह आणि त्यांच्या अगदी जवळच्या असलेल्या एका भाजप नेत्यावरील ड्रग तस्करीचे प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणल्या जात असल्याचे म्हटले आहे.

पोलिस जर निःपक्षसपने त्यांचे काम करीत असेत तर त्यांना काम करण्यासाठी पूर्णपणे मोकळीक दिली पाहिजे. परंतु असो होताना दिसत नाही. राजकीय नेते पोलिसांना नेहमीच दबावाखाली ठेवतात. ते जर राजकीय नेत्यांच्या विरोधात गेले तर त्यांना निलंबित करण्यात येते किंवा त्यांची बदली केली जाते. इतकेच नव्हे तर राजकीय नेत्यांच्या विरोधात जाणाऱ्या पोलीसांना पदोन्नती सुद्धा मिळत नाही. हे सर्व माहित असतानाही काही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडण्यात कोणतीही तडजोड करीत नाही आणि कायद्याचे तंतोतंत पालन करतात. गुजरातच्या पोलीस कॉन्स्टेबल सुनिता यादव यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या राज्यमंत्री कनानी यांच्या मुलाची कार अडविली. लॉकडाऊनच्या काळात राज्यमंत्र्यांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत नाईट कर्फ्युचे उल्लंघन करीत फिरत होता. सुनिता यादव यांच्या विरोधात मात्र चौकशी सुरु झाली. लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करणे कॉन्स्टेबल सुनिताच्या अंगावर आले. यांना धमकीही देण्यात आली. याचप्रमाणे मणिपुरच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी थोउनाओजम वृदा यांनी उच्च न्यायलायात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असून या प्रतिज्ञपत्रात त्यांनी मुख्यमंत्री वीरेंद्रसिंह आणि त्यांच्या अगदी जवळच्या असलेल्या एका भाजप नेत्यावरील ड्रग तस्करीचे प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणल्या जात असल्याचे म्हटले आहे. वृंदा ह्या मणिपूर नार्कोटिक्स अँड अफेयर्स ऑफ बॉर्डर ब्युरोच्या वरिष्ठ अधिकारी आहेत. हे प्रकरण इ.स. २०१८ मधील आहे. वृंदा यांच्या नेतृत्वाखाली चमूने त्यावेळी धाड टाकून ८ जणांना अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध रक्कम ठेवल्याबद्दल अटक केली होती. पोलीस जर राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुले बनून काम करीत असेल तर त्यांच्यावर कोणीही आक्षेप घेणार नाही. परंतु त्यांनी जर राजकीय नेत्यांच्या कुटूंबीयांविरुद्ध जर काही कारवाई केली तर मात्र त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागते. मणिपूर अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मुख्यमंत्र्यी वीरेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर आपण काहीही बोलणार नाही.