gorkha janmukti morcha

बंगालमध्येही विधानसभा निवडणूक होणार असून तेथेही भाजपाला जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चानेही (जीजेएम) एनडीएसोबत संबंध विच्छेद घेतला आहे. जीजेएमचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत युती करण्याची घोषणा केलेली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’मधून एकापाठोपाठ एक पक्ष बाहेर पडत आहे. याबाबत भाजपा जरी कोणतीही दखल घेत नसले तरी एनडीएसाठी मात्र हे शुभसंकेत निश्चितच नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी २४ राजकीय पक्षांना एकत्र आणून एनडीएची स्थापना करुन केंद्रात सरकार स्थापन केले होते. ५ वर्षेपर्यंत यशस्वीरित्या त्यांनी एनडीएचे सरकार चालविले, परंतु ध्या मोदी सरकारमधील शिवसेनेने भाजपासोबत असलेली त्यांची जुनी मैत्री तोडली आणि राष्ट्रवादी व काँग्रेस सहकार्याने राज्यात महाविकास आघाडी करुन सरकार स्थापन केले. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करीत शिरोमणी अकाली दल एनडीएमधून बाहेर पडले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पासवान यांचा पक्ष लोजपानेही एनडीएपासून फारकत घेतली आणि नितीशकुमार यांच्या जदयुविरोधात विधानसभा निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतला. काही दिवसानंतर बंगालमध्येही विधानसभा निवडणूक होणार असून तेथेही भाजपाला जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चानेही (जीजेएम) एनडीएसोबत संबंध विच्छेद घेतला आहे. जीजेएमचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत युती करण्याची घोषणा केलेली आहे. जीजेएम उत्तर बंगालमध्ये, खासकरुन दार्जिलिंग विभागात प्रभावशाी आहे. गुरुंग यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीमध्ये भाजपाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इतके दिवसपर्यंत शांत बसलेल्या बिमल गुरुंग यांनी बंगालच्या निवडणुका जवळ येताच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. असा आरोप केला आहे. गुरुंग यांच्या या आरोपामुळे भाजपामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. ममता बॅनर्जी सरकार मात्र त्यांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करीत असल्याचेही गुरुंग यांनी म्हटले आहे. यामुळेच गोरखा जनमुक्ती मोर्चा एनडीएपासून विभक्त झालेला आहे. इ.स. २०२१ च्या बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करुन भाजपाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा मानस गुरुंग यांनी व्यक्त केला आहे. इ.स. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत जो पक्ष त्यांच्या स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीचे समर्थन करेल, त्यांनाच समर्थन देण्याची घोषणाही गुरुंग यांनी केली आहे. इ.स. २०१९ च्या गोरखालँड आंदोलनाच्या वेळी बिमल गुरुंग भूमिगत झाले होते. त्यांच्यावर अतिरेकीविरोधी कायद्यातील खटला दाखल करण्यात आला होता. खरं म्हणजे स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीला ममता बॅनर्जी यांनीही विरोध केला होता, परंतु ममता बॅनर्जीसोबत युती करण्याची भाषा ते करीत आहेत. हा राजकीयत संधिसाधूपणा नव्हे काय?