सरकार प्रशंसासूचक व्यवस्थापनात व्यस्त , निर्मला सीतारामण यांच्या पतीचे टीकास्त्र

ज्या व्यक्तिची पत्नी देशाच्या अर्थमंत्री असेल, आणि त्या व्यक्तिनेच जर कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनावर टीका केली असेल तर ती बाब जरा विचित्रच वाटते.

    देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती परकला प्रभाकर अर्थशास्त्रज्ञ आहेत. देशाची सद्यपरिस्थिती पाहून ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी देशाच्या सद्यपरिस्थितीबाबत जे वक्तव्य केलेले आहेत, ते तर्कसंगत आहेत. ‘परकला प्रभाकर यांनी यु ट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार ‘कोरोना महामारीच्या काळात गरिबांना मदत करण्याऐवजी प्रशंसासूचक व्यवस्थापन करीत आहेत. सरकार स्वतःची पाठ स्वतःच थोपटत आहेत. त्यांना जे मुद्दे असुविधाजनक वाटतात, त्यावर बोळणे सरकार टाळत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कोरोना व्हॅक्‍सीनच्या संदर्भात काही सूचना केंद्र सरकारला केल्या होत्या. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही तर त्यावर केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनी अत्यंत चुकीची प्रतिक्रिया व्यक्‍त केली. हर्षवर्धन यांनी कोरोना लसींचा मुद्दा राजकीयच बनवून टाकला. ॥ ‘छॉकडाऊन लावणे हा कोरोना महामारीवर उपाय ठरू शकत नाही. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार थांबविता येणार नाही तर कोरोना लसींचे उत्पादन होईपर्यंत कोरोनाचे संक्रमण तेवढे थांबविता येईल. प्रभाकर यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या वेळेचा उपयोग आम्हाला आमची रूग्णालये अधिक सुविधाजनक करण्यासाठी करायला पाहिजे होता. परंतु त्यावेळी आम्ही दिवे लावत होतो आणि थाळ्या वाजवित होतो. श्रमिकांनी आपापल्या गावाची वाट धरली. यामुळे तर सरकार किती निष्ट्र बनले आहे, हे स्पष्ट झाळेळे आहे. कोरोनाच्या तपासण्या कमी होत आहे आणि कोरोना प्रतिबंधक लसींचेही उत्पादनही घटले आहे, याबद्दल प्रभाकर यांनी चिंता व्यक्‍त केली आहे. सरकारचा बेजबाबदारपणा यातून स्पष्ट होतो. तथापि पंतप्रधान त्यांच्या वक्‍्तृत्वशैलीमुळे जनतेवर प्रभाव टाकीत आहेत. अनेकदा पंतप्रधानांचे वक्तृत्व नाटकीय स्वरूपात बदलत असते. जनतेशी संबंधित मुद्दयांवर मौन राहणे, हे फार काळ उपयोगाचे नसते. ते राष्ट्रासाठी घातकच असते. सरकार आणि सत्ताधारी पक्ष हे व्यवस्थापनाचे जणू खेळाडूच बनलेले आहेत!