एच- १ बी व्हिसावर बंदी केवळ ट्रम्प असेपर्यंतच

  • व्हिसा संदर्भात ट्रम्प यांना निर्णय तेथील आयटी आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीयांना मुळीच आवडला नाही. व्हिसाच्या अडचणीमुळे अमेरिकेतल भारतीय कॅनजाडामध्ये स्थलांतरित होईल. तेथे अशी कोणतेही बंधने नाहीत. दरम्यान डेमॉक्रॅटिक या विरोधी पक्षाने त्यांच्या निवडणूका जाहीरनाम्यात नमूद केले आहे की, आम्ही जर सत्तेवर आलो तर ग्रीन कार्डवर लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात येईल.

आगामी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ लागली आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बाईडेन यांच्यामध्ये जोरदार लाढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमेरिकन नागरिकांना खूश करण्यासाठी ट्रम्प यांनी एका नवीन अध्यदेशावर स्वाक्षरी केली आहे. या नवीन अध्यादेशाप्रमाणे आता अमेरिकेत भारतीयांना नोकऱ्या मिळणार नाही. कमी पगारात नोकऱ्या करणाऱ्या विदेशी नागरिकांना घेऊन आता मेहनती अमेरिकन नागरिकांना डावल्या जाणार नाही. असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आङे. यापूर्वीही ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ अशी घोषणा केलेली आहे. गेल्या २३ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, या वर्षीच्या अखेरपर्यंत कोणत्याही विदेशी नागरिकाला एच-१ बी व्हिसा अंतर्गत नोकरी दिल्या जाणार नाही. ट्रम्प यांचे हे सारे प्रयत्न त्यांना पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी आहेत म्हणूनच ते अमेरिकन नागरिकांचे तुष्टीकर करीत आहेत, परंतु ते हे विसरत आहेत की, अमेरिकेच्या  एकूण लोकसंख्येत १ टक्का असे भारतीय आहेत की, ज्यांना ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले आहेत. हे सर्व जण अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमाचे जेव्हा अमेरिकेत आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ट्रम्प यांनी तेथे वास्तव्यात असलेल्या भारतीय नागरितांचा उत्साह आणि जोश पाहिलेला आहे. व्हिसा संदर्भात ट्रम्प यांना निर्णय तेथील आयटी आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीयांना मुळीच आवडला नाही. व्हिसाच्या अडचणीमुळे अमेरिकेतल भारतीय कॅनजाडामध्ये स्थलांतरित होईल. तेथे अशी कोणतेही बंधने नाहीत. दरम्यान डेमॉक्रॅटिक या विरोधी पक्षाने त्यांच्या निवडणूका जाहीरनाम्यात नमूद केले आहे की, आम्ही जर सत्तेवर आलो तर ग्रीन कार्डवर लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात येईल. ग्रीन कार्ड हा असा दस्तावेज आहे की, ज्यांच्याजवळ हे कार्ड आहे, त्यांना स्थायी रुपात अमेरिकेत राहण्याचा अधिकार असतो. एच-१ बी व्हिसावर अमेरिकेतील अनेक कंपन्या दरवर्षी भारत आणि चीन मधून आलेल्या हजारो कर्मचाऱ्यांची भर्ती करत असतात. येत्या १७ ते २० ऑगस्ट दरम्यान डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातले असून या अधिवेशनात बाईडन यांच्या नावावर राष्ट्रपतीपदाचे पक्षाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. डेमॉक्रॅटिक पक्ष सत्तेवर आल्यास भारतासोबत अणुतंत्रज्ञान विषयक करारावर सुद्धा स्वाक्षरी करेल. या सर्व घडामोडींवरुन हे स्पष्ट होते की, एच-१ बी व्हिसावर बंदी केवळ ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष असेपर्यंतच राहणार आहे.