How can the election symbol be the party's 'logo'? sj

'कमळ हे एका राजकीय पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे ते चिन्ह दुसऱ्या राजकीय पक्षाला कसे काय देण्यात आले? या प्रकरणी पुढील सुनावणी १२ जानेवारी रोजी होणार असून निवडणूक आयोगाला आपला जबाब दाखल करावा लागणार आहे.

भारतीय जनता पक्ष (BJP) स्थापनेपासूनच म्हणजे इ.स. १९८० पासून ‘कमळ’ या निवडणूक चिन्हाचा ( election symbol) वापर करीत आहे. यावर अजूनपर्यंत कोणीही आक्षेप घेतला नाही. परंतु आता मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल करून ‘कमळ’ या निवडणूक चिन्हाला आव्हान देण्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे गोरखपूर येथील नेते कालीशंकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला त्यांचे निवडणूक चिन्ह पक्षाचा ‘लोगो’ (logo)  म्हणूनच वापरण्याचा अधिकार नाही. निवडणूक चिन्ह हे केवळ निवडणुकीपुरतेच सिमित असते. कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे निवडणूक चिन्ह कोणत्याही अपक्ष उमेदवाराला देण्याचा अधिकार नाही. या संदर्भात सुनावणी करताना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारले आहे की, कमळ हे एका राजकीय पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे ते चिन्ह दुसऱ्या राजकीय पक्षाला कसे काय देण्यात आले? या प्रकरणी पुढील सुनावणी १२ जानेवारी रोजी होणार असून निवडणूक आयोगाला आपला जबाब दाखल करावा लागणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूतिंद्रय गोविंद माथूर आणि पीयुष अग्रवाल यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, निवडणूक चिन्ह केवळ निवडणुकीसाठीच आवंटित करण्यात येते. इतर कार्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकत नाही. तेव्हा अन्य उद्देशासाठी त्या चिन्हाचा वापर करण्याची परवानगी का दिली जाते? उल्लेखनीय असे की, काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह प्रथम बैलजोडी त्यानंतर गाय-वासरू आणि आता पंजा आहे, परंतु पक्षाच्या ध्वजावर मात्र चरखा आहे. काँग्रेस त्यांच्या निवडणूक चिन्हाचा वापर ध्वजावर किंवा अन्य ठिकाणी कधीच करीत नाही. समाजवादी पक्षसुद्धा त्यांच्या सायकल या निवडणूक चिन्हाचा वापर केवळ निवडणुकीमध्येच करीत असते.

न्यायालयाचा प्रश्‍न यासाठी आहे की, पक्षाचे अधिवेशन असो, सभा किंवा पक्षाचे लेटर पॅड असो भाजपा त्यावर पक्षाच्या कमळ या निवडणूक चिन्हाचा सर्रास वापर करते, हे न्यायालयाने बघितले आहे. निवडणुकाव्यतिरिक्‍त इतरत्र या चिन्हाचा वापर का करण्यात येतो? या संदर्भात स्थिती स्पष्ट व्हायला हवी. निवडणूक चिन्हाच्या बाबतीत नियमांचे पालन करण्यात आले पाहिजे. निवडणूक चिन्हाचा निवडणुकीव्यतिरिकत वापर करणे योग्य आहे का? उच्च न्यायालयाने योग्य प्रश्‍न उचललेला आहे. निवडणूक आयोगाला याचे उत्तर द्यावेच लागेल, आयोगाला कोणतेही निवडणूक चिन्ह गोठवण्याचा अधिकार आहे. यापूर्वीही आयोगाने अशा प्रकरणामध्ये निवडणक चिन्ह गोठविलेले आहे.