nitish kumar

तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर असा आरोप केला आहे की, नितीशांनी बुद्धिपुरस्सर भ्रष्टाचा-याला मंत्री बनविले होते. मंत्री बनविल्याबरोबर त्यांच्यावर आरोप 'होऊ लागले. तरीही त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

भ्रष्टाचाराचे (corrupt) आरोप असलेले डॉ. मेवालाल चौधरी यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शिक्षणमंत्री बनविण्याची चूक केली. सुशासन बाबू’ म्हणविणा- या नितीशकुमारांनी मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लावलीच कशी? असा प्रश्‍न उपस्थित झालेला असतानाच डॉ. मेवालाल यांनी अवघ्या ७२ तासांमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी डॉ. मेवालाल यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतले आणि त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. या चर्चेनंतर डॉ. मेवालाल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते कुलगुरू असताना भागलपूर कृषी विद्यापीठांमध्ये इ.स. २०१२ मध्ये सहायक प्राध्यापक आणि कनिष्ठ वैज्ञानिकांची भरती करण्यात आली होती. या भरतीमध्येही भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. (corrupt leader as a minister) त्यांची पत्नी स्व. नीता चौधरी यांचे संशयास्पद परिस्थितीमध्ये निधन झाले. याप्रकरणी डॉ. मेवालाल यांच्यावर आरोप आहेत. गतवर्षी गॅस सिलिंडरमुळे लागलेल्या आगीत त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. डॉ. मेवालाल यांचे राजकीय रेकॉर्ड संशयास्पद आहेत. यांच्या बंगल्यावर मंत्रिपदाची नेमप्लेट लागण्यापूर्वीच त्यांना राजीनामा द्यावा लागला.

तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर असा आरोप केला आहे की, नितीशांनी बुद्धिपुरस्सर भ्रष्टाचा-याला मंत्री बनविले होते. मंत्री बनविल्याबरोबर त्यांच्यावर आरोप होऊ लागले. तरीही त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर काही तासातच डॉ. मेवालाल यांच्या राजीनाम्याचे नाटक करण्यात आले. यामध्ये खरे दोषी तर मुख्यमंत्री नितीशकुमारच आहेत. यापुढे अशाप्रकारची नाटकबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही तेजस्वी यांनी दिला. एका राजीनाम्याने भ्रष्टाचाराचे मुद्दे संपणार नाही.

नितीशांनी राज्यातील बेरोजगारांसाठी १९ लाख नोक-या उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिलेले आहेत. ‘समान काम समान वेतन’ यासारखे अनेक मुद्दे आहेत. या सर्व मुद्दयांवर सरकारला घेरण्यात येईल, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. नितीशकुमार यांच्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांचा पक्ष आणि सरकारची प्रतिमा खराब झालेली आहे. तारापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या डॉ. मेबालाल चौधरी यांनी जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळीच विरोधी सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला होता. गेल्या दोन दिवसापासून राजदकडून मेवालाल चौधरीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत व त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. अखेर नितीशांच्या लक्षात आले आणि त्यांनी डॉ. मेवालाल यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. या संपूर्ण प्रकरणावरून हे स्पष्ट होते की, नितीशांचे निर्णय चुकीचे असून राजद एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून आगामी काळात सरकारच्या सर्वच निर्णयावर लक्ष ठेवणार आहे.