medical

आयुर्वेद डॉक्टर हे सर्जरी करण्यास अयोग्य असल्याचे आयएमएने म्हटले आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही आयएमएने केली आहे. हा निर्णय मेडिकल संस्थांमध्ये चोर दरवाजाने घुसण्याचा प्रयत्न असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

आयुष मंत्रालयांतर्गत (Aayush Mantralaya) येणा-या दि सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसीन (सीसीआयएम)च्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेला केंद्र सरकारकडून (Central Government) हिरवा झेंडा मिळाला आहे. या नवीन अधिसूचनेनुसार आयुर्वेदमध्ये (Ayurveda) पीजी (स्नातकोत्तर) करणा-या डॉक्टरांना आता ऑर्थोपेडिक सर्जरी व्यतिरिक्त डोळे, कान आणि गळ्याचे ऑपरेशन करण्याचीही परवानगी असेल. आयुर्वेदमध्ये पीजी करणा-या विद्यार्थ्यांना आता ब्रेस्ट कॅन्सर, अल्सर, मूत्रपिंड, मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचे प्रशिक्षण घेण्याचा अधिकार दिल्या जाणार आहे.

एकीकडे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत असतानाच दुसरीकडे मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. आयुर्वेद डॉक्टर हे सर्जरी करण्यास अयोग्य असल्याचे आयएमएने म्हटले आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही आयएमएने केली आहे. हा निर्णय मेडिकल संस्थांमध्ये चोर दरवाजाने घुसण्याचा प्रयत्न असल्याचे आयएमएने म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ‘नीट’सारख्या परीक्षांचे महत्त्व राहणार नाही. वस्तुस्थिती तर अशी आहे की, देशातील रोग्यांची संख्या पाहू जाता डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे.

ॲलोपॅथीच्या तुलनेत आयुर्वेद ही फार जुनी चिकित्सा पद्धत आहे. यामध्येसुद्धा सुश्रुतसारखे शल्यविशेषज्ञ होऊन गेले, जे अत्यंत कठीण असलेले ऑपरेशन करून रोगी दुरुस्त करीत होते. सुश्रुत यांच्याकडे त्याकाळात असे काही यंत्र होते की, त्याद्वारे ते कठीणातले कठीण ऑपरेशन करीत होते. ॲलोपॅथीमुळे रोगाचे केवळ लक्षण दूर होऊन रोग्यांना तात्पुरता आराम मिळत असतो, परंतु आयुर्वेदामुळे रोगाचे मुळासकट उच्चाटन होत असते. धन्वंतरी, दिवोदास, चरक सारख्या महान आयुर्वेदाचार्यांनी आयुर्वेदाचे महत्त्व वाढविले आहे. सर्जरी आयुर्वेदामध्येही आहे. बीएमएसचा अर्थ आहे, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन अन्ड सर्जरी. जर आयुर्वेदाचा विद्यार्थी मेहनतीने स्नातकोत्तर शिक्षण घेऊ शकतो तर तो विद्यार्थी ऑपरेशन नक्कीच करू शकेल.

Dआयएमएला असे वाटते की, जर आयुर्वेदच्या डॉक्टरांना ऑपरेशन करण्याची परवानगी दिली तर एमएस करणा-या ॲलोपॅथिक डॉक्टरांना स्पर्धक निर्माण होईल. ॲलोपॅथीचे डॉक्टर सुरुवातीपासूनच स्वतःला अन्य चिकित्सकांपेक्षा श्रेष्ठ समजत आलेले आहेत, परंतु अनेक असे रोग आहेत की, ज्यांचा इलाज ॲलोपॅथीमध्ये नाही. आयुर्वेदाच्या क्षमतेवर अविश्‍वास व्यक्‍त करण्याऐवजी आयएमएने समन्वय आणि सहयोगाची भूमिका स्वीकारली पाहिजे. देशातील रोग्यांची संख्या पाहू जाता आरोग्यसेवांचा विस्तार होण्याची नितांत गरज आहे.