कर्नाटक विधानपरिषदेत काँग्रेस आमदारांचे अशोभनीय वर्तन

कर्नाटक विधानपरिषदेतील (Karnataka Legislative Council ) काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहाची परंपरा आणि शिस्त अक्षरशः मोडीत काढली आहे. विधानपरिषदेत काँग्रेस सदस्यांनी जो धुडघूस घातला, तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे.

काँग्रेस आमदारांनी (Indecent behavior of Congress MLAs) विधानसभेतही या कायदयांच्या अनुषंगाने गोंधळ घातला होता आणि आता विधानपरिषदेतही सर्व मर्यादा ओलांडल्या. काँग्रेस आमदारांनी विधानपरिषदेत या ‘कायदयाविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक विधानपरिषदेतील (Karnataka Legislative Council ) काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहाची परंपरा आणि शिस्त अक्षरशः मोडीत काढली आहे. विधानपरिषदेत काँग्रेस सदस्यांनी जो धुडघूस घातला, तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे. विधिमंडळाच्या (legislature) वरिष्ठ सभागृहातील सदस्यांनी ज्याप्रकारे सभागृहात वर्तन केले, ते त्यांचे कृत्य अशोभनीय असेच होते. सदस्यांच्या अशाप्रकारच्या वागण्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जाते. खरं म्हणजे सदस्यांनी सभागृहात विषयानुरूप योग्य चर्चा केली पाहिजे. ‘एखादा विषय सभागृहात लावून धरणे, हे सदस्यांचे काम आहे.

सभागृहात मारपीट करणे हे आमदारांचे काम नव्हे, याची जाणीव सदस्यांनी ठेवायला हवी. कर्नाटक विधानपरिषद सभागृहात गोरक्षा ‘कायदयावरून जोरदार गोंधळ उडाला. काँग्रेस आमदारांनी सभागृहात अशोभनीय वर्तन केले. विधानसभेत गोरक्षण संरक्षण विधेयक ९ डिसेंबर रोजी पारीत झाले होते. हे विधेयक विधानपरिषदेत चर्चेसाठी मांडण्यात आले होते, परंतु काँग्रेस आमदारांनी गोहत्या संरक्षण विधेयक मंजूर करून त्यानुषंगाने कायदा करण्यासाठी विरोध केला. काँग्रेस आमदारांनी विधानसभेतही या कायदयांच्या अनुषंगाने गोंधळ घातला होता आणि आता विधानपरिषदेतही सर्व मर्यादा ओलांडल्या. काँग्रेस आमदारांनी विधानपरिषदेत या कायदयाविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली. उपसभापतींना त्यांच्या खुर्चीवरून खाली उतरविले व त्यांना धक्काबुक्की केली.

दरम्यान काही सदस्यांनी या गोंधळी सदस्यापासून उपसभापतींचा बचाव केला. यानंतर काँग्रेसच्या सर्ब आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. याबाबतीत काँग्रेस सदस्यांचे म्हणणे असे आहे की, ज्यावेळेस हा गोंधळ उडाला, त्यावेळी सभागृहाची कारवाई सुरू नव्हती. भाजप आणि जनता दल (से.) च्या सदस्यांनी उपसभापतींना बेकायदेशीररित्या सभापतीच्या खुर्चीवर बसविले होते, असे काँग्रेस आमदारांचे म्हणणे आहे. उपसभापतींना खुर्चीवरून उतरण्यास सांगितल्यानंतरही त्यांनी खुर्ची सोडली नाही, त्यामुळे आम्हाला त्यांना खुर्चीवरून उतरावे लागले, असे काँग्रेस आमदारांनी सांगितले. सभागृहात कशीही परिस्थिती उद्भवली तरी सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे. सभागृहाची प्रतिष्ठा मलिन होईल, असे कोणतेही कृत्य सदस्यांनी करू नये.

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने सभागृहात संतुलित भूमिका घेणे आवश्यक होते. विधिमंडळाच्या सभागृहात जनतेच्या प्रश्‍नांवर चर्चा व्हायला पाहिजे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या आमदारांना सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे कोणतेही कृत्य करू नये, अशाप्रकारच्या सूचना दिल्या पाहिजे. अशा प्रकारांमळे सभागहाबरोबरच पक्षाची प्रतिमाही डागाळू शकते.