भारतीय क्रिकेट चमूचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

भारताने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धूळ चारून ही मालिका जिंकली. चेतेश्वर पुजारा यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या वेगवान चेंडूचा भिंत बनून सामना केला. ऋषभ पंत यांनी सुंदर यष्टिरक्षण केले. ऋषभने यष्टिरक्षणात महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे टाकले. शुबमन गिलने सुनील गावस्करांचा उचांक मोडला.

भारतीय खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त धावांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताची अर्धी क्रिकेट चमू जखमी झाली असताना आणि कर्णधार विराट कोहली स्वदेशी ‘परतल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी जिद्दीने खेळून ऑस्ट्रेलियाला पराभूत करून ४ सामन्यांच्या मालिकेमध्ये २-१ ने विजय मिळविला. भारतीय चमू ऑस्ट्रेलियावर विजय मिळवेल असा विचारही कोणी केला नसेल, परंतु भारतीय चमूने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून आपल्या खेळाचे सुंदर प्रदर्शन केले.

ही बाब निश्चितच भारतीयांसाठी गौरवाची आहे. या विजयामुळे बॉर्डर-गावस्कर चषक आता भारताकडेच राहणार आहे. याबरोबरच भारतीय चमूने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ऑस्ट्रेलियाला ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर ३२ वर्षांनंतर पहिल्यांदा टेस्ट मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या मैदानावर भारताचा हा पहिला विजय आहे. सुरुवातीला असे वाटत होते की, भारतीय चमू हा सामना केवळ ड्रॉ करण्यासाठी खेळतील, परंतु असे न होता भारताने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धूळ चारून ही मालिका जिंकली. चेतेश्वर पुजारा यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या वेगवान चेंडूचा भिंत बनून सामना केला. क्रषभ पंत यांनी सुंदर यष्टिरक्षण केले. क्रषभने यष्टिरक्षणात महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे टाकले.

शुबमन गिलने सुनीळ गावस्करांचा उचांक मोडला. भारतीय खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त धावांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ आहे. बुमराह आणि शमी या प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत सिराज आणि शार्दूल या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. या दोघांनीही क्रमशः ५ आणि ४ गडी बाद करून हा सामना अधिक रंजक बनविला. अखेरच्या दिवशी भारतीय खेळाडू वन-डे क्रिकेटसारखे खेळले.

संपूर्ण भारतीय चमू ३६ धावावर बाद होईल, असा दावा करणार्‍यांची तोंडेच भारतीय खेळाडूंनी बंद करून टाकली. माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटले आहे की, हा नवा भारत आहे, जो घरात घुसून मारत असतो. मदनलाल यांनी म्हटळे आहे की, भारतीय चमूने मिळविलेला असा विजय आपण आपल्या क्रिकेट जीवनात अजूनपर्यंत पाहिलेला नाही. भारतीय चमूचे त्रिवार अभिनंदन.