भारताचा चीनला झटका

भारताच्या अनेक उत्पादनांना चीनने त्यांच्या बाजारात बंदी घातलेली आहे. चीनचे रशियासोबत संबंध असले तरी भारतालाही रशियाचा दबाव आणावा लागणार आहे. यासाठी भारताला मुत्सद्देगिरी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

भारताने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. कोरोना महामारी पाहू जाता हा निर्णय घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) जरी म्हटले असले, तरी हा निर्णय घेण्यामागे भारताची मुत्सद्देगिरी आहे. या पथसंचलनामध्ये शांघाई कोऑरेशन संघटनेचे (एससीओ) सर्व सदस्य असतानाही चीन आणि पाकिस्तानच्या कुटिल कारवाया पाहू जाता भारताने या पथसंचलनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा हा निर्णय योग्य आहे. चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी आणि पूर्वस्थिती पुन्हा कायम ठेवण्यास केलेला विरोध भारतासाठी असह्य आहे. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे चीनसोबत मैत्रीपूर्ण युद्धाभ्यास करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आमच्या सैनिकांचे शोर्य चीनने बघितले आहे. यानंतरही मुस्तद्देगिरी म्हणून शांघाई सह्योग संघटनेचे सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी भारत या युद्धाभ्यासामध्ये सहभागी होणार आहे व यासाठी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग रशिया दौऱ्यावर गेलेले आहेत. सीमाप्रश्न बाजूला ठेवून उभय देशांनी द्विपक्षीय संबंध वाढविलेले आहेत. परंतु गलवान खोऱ्यात दोन्ही देशातील सैनिकांमध्ये जो संघर्ष झालेला होता, त्यावरुन चीनचा असली चेहरा पुढे आला आहे. एकीकजे चीन भारतावर दबाव टाकत आहे. आणि शेजारी राष्ट्रांना आपल्या जाळ्यात ओढून भारताची घेराबंदी करण्याचे प्रयत्न करीत आहेत. याशिवाय भारतीय बाजारावर कब्जा करण्याचाही प्रयत्न चीन करीत आहे. भारताच्या अनेक उत्पादनांना चीनने त्यांच्या बाजारात बंदी घातलेली आहे. चीनचे रशियासोबत संबंध असले तरी भारतालाही रशियाचा दबाव आणावा लागणार आहे. यासाठी भारताला मुत्सद्देगिरी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. जेव्हा चीन चुकतो तेव्हा उल्टा चोर कोतवाट को डाटे या म्हणी प्रमाणे भारताला शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन करीत असतो. भारतावर एलएसीचे उल्लंघन करण्याचा आरोप चीन लावत आहे. मागील २९ आणि ३० ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा चीनने भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न हानून पाडला. चीनच्या २०० सैनिकांना आल्या पावलांनी परतावे लागले होते. आशिया खंडात भारतच असा देश आहे की जो चीनसमोर झुकत नाही.