कोरोनाचा व्यवसायावर प्रभाव देशातील १०,११३ कंपन्या बंद

'कोरोना महामारीचा केवळ आरोग्यावरच नाही तर, अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या १० महिन्याच्या कालावधीत देशातील १० हजारांपेक्षा अधिक कंपन्यांमध्ये व्यवसाय बंद झाला आहे.

    कंपन्या बंद झाल्यामुळे उत्पादनास अधिक नुकसान झाले आहे. यासोबतच बेरोजगारीही मोठ्या प्रमाणावर वाढली. ज्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. अशा लोकांजवळ दुसरा कोणताही पर्याय राहिला नव्हता. जेथे आपण काम करीत आहोत, ती कंपनी अशी अचानक बंद पडेल, याचा लोकांनी विचारही केला नव्हता. कुठलाही कर्मचारी असो, त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाची मोठी जबाबदारी असते. घरच्या कर्त्या माणसाची नोकरी गेल्यास कुटुंबातील सदस्यांची काय स्थिती झाली असेल, याचा विचार करणेही कठीण आहे.

    घराचा खर्च, घरभाडे, मुलांची फी या सर्वांचा खर्च आता नोकरी गेलेला व्यक्‍ती कुठून करणार, काही बचत असेळ तर त्याचीही विभागणी करण्यात आली असेल, शेवटी त्यांच्यासमोर उदरनिर्वाह कसा करायचा असा यक्ष प्रश्‍न निर्माण होत आहे. कोरोनामुळे जारी करण्यात आलेल्या ‘हॉकडाऊनमुळे मागणी प्रभावित झाली आणि मागणी नसल्यामुळे उत्पादन ठप्प पडले. मोठ-मोठ्या कंपन्या सर्रासपणे बंद होत आहेत. कापेरिट प्रकरणातील मंत्रालयाजवळ उपलब्ध नवीन आकड्यांनुसार, फेब्रुवारीपर्यंत सुरू आर्थिक वर्षात कंपनी कायद्याची कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १०,११३ कंपन्या बंद करण्यात आल्या होत्या.

    या कलमाचा अर्थ आहे की, कंपन्या कुठल्या दंडात्मक कारवाईमुळे नाही तर स्वेच्छेने बंद झाल्या आहेत. महामारीमुळे विविध राज्यांत बंद झालेल्या कंपन्यांची संख्या याप्रकारे आहे. दिल्ली 2,394, उत्तरप्रदेश 1,936, महाराष्ट्र 1,279, तामिळनाडू 1,322, कर्नाटक 836, तेलंगणा 404, केरळ 137, झारखंड 137, मध्यप्रदेश 111, कापेरिट प्रकरणातील राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, त्यांचे मंत्रालय अशा कुठल्याच कंपन्यांचा रेकॉर्ड ठेवत नाही, जे व्यवसायातून बाहेर झाल्या आहेत.