blood pressure

युरोपातील लोकांच्या शरीराची जडणघडण, त्यांचे खाणे-पिणे आणि दैनंदिन जीवन जगण्याच्या पद्धती वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि म्हणून तेथे स्वास्थ्य परीक्षण किंवा इलाज करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. युरोपमध्ये थंडी खूप असते. भारतातील वातावरण मात्र उष्ण आहे. म्हणुनच युरोप आणि भारतातील लोकांची सहनशक्ती भिन्न आहे.

भारतात ॲलोपॅथी चिकित्सा (Allopathy therapy) पाश्चिमात्य देशातून (Westerner Country) आलेली आहे. हजारो वर्षांपासून भारतात आयुर्वेद चिकित्सा (Ayurveda medicine) पद्धती होती. सुश्रूतत आणि चरक या चिकित्सापद्धतीचे जनक आहेत. आयुर्वेद चिकित्सा पद्धती ही रोगाला कायमस्वरुपी निकालात काढते. आयुर्वेदाला पंचमवेदही म्हटल्या जाते. या चिकित्सा पद्धतीमध्ये रोग्यांची नाडी परीक्षा करण्यात येते. वात-कफ-पित्ताच्या आधारावर रोगाचे निरीक्षण करण्यात येते. ॲलोपॅथी युरोपातून आलेली उपचारपद्धती आहे. युरोपातील लोकांच्या शरीराची जडणघडण, त्यांचे खाणे-पिणे आणि दैनंदिन जीवन जगण्याच्या पद्धती वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि म्हणून तेथे स्वास्थ्य परीक्षण किंवा इलाज करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. युरोपमध्ये थंडी खूप असते. भारतातील वातावरण मात्र उष्ण आहे. म्हणुनच युरोप आणि भारतातील लोकांची सहनशक्ती भिन्न आहे. भारतात ४५ डिग्री तापमानातही लोक बाहेर फिरतात, परंतु युरोपमधील व्यक्ती जर इतक्या तापमानात बाहेर फिरायला निघाला तर तो मुर्च्छित होऊन पडल्याशिवाय राहणार नाही. भारतामध्ये करोडो लोक निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. आपल्या देशात ६ ऋतू आहेत. पाश्चिमात्य देशात मात्र तीनच ऋतू आहेत. व्यक्तीच्या स्वास्थ्यावर वातावरणाचा मोठा प्रभाव पडत असतो. आपल्या देशातील खानपानाच्या पद्धतीही युरोपपेक्षा वेगळ्या आहेत. हे लक्षात घेऊन कॉर्डियॉलॉजी सोसायटी ऑफ इंडियाने अमेरिका आणि युरोपातील गाईडलाईन भारतीयांना लागू पडत नाही. असे म्हटले आङे. युरोपियन कॉर्डियॉलॉजी सोसायटीने गेल्या जून महिन्यात ब्लडप्रेशरचा सामान्य स्तर १३०/९० ऐवजी १४० / ९० ठरविला आहे. ह्रदयरोग विशेषाज्ञांच्या मते भारतीयांचे ब्लडप्रेशर धूम्रपान आणि अल्कहोल प्राशनामुळे १४९/९० च्या वर जाते. त्यामुळे यावर इलाज करावा लागतो. देशातील ३६ टक्के लोक ब्लडप्रेशरने त्रस्त आहेत. हे ब्लडप्रेशर नियंत्रित केले नाही तर ह्रदयविकाराचा धोका होऊ शकतो. देशातील जनतेने पाश्चिमात्यांचे अनुकरण न करता भारतीय वातावरणाला अनुरुप जीवन जगणे महत्त्वाचे आहे.